छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ. माधव सावरगावे छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी !

संभाजीनगर लाईव्ह, दि. 7 सप्टेंबर :- छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिस्वीकृती समितीची अध्यक्ष निवडीची बैठक संचालक (माहिती) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभाग, कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत साम टि. व्ही. छत्रपती संभाजीनगरचे डॉ. माधव गुणवंतराव सावरगावे यांची विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य चक्रधर दळवी, विनोद काकडे, अनिल महाजन, अरुण सुरडकर यांनी प्रक्रियेत सहभाग घेतला.

डॉ.माधव सावरगावे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सदर निवडणूक प्रक्रिया संचालक (माहिती) कार्यालय, छत्रपती संभाजीनगरचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्यांसह जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने,माहिती अधिकारी मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!