छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

गजानन महाराज मंदिर फुटपाथ वरील अतिक्रमण जमीनदोस्त ! सेंट्रल नाका ते एमजीएम मनियार चौकापर्यंत कारवाईचा बडगा !!

वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहनांकडून दंड वसूल

संभाजीनगर लाईव्ह, दि.२८ – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आणि सिडको वाहतूक विभागाच्या वतीने आज सकाळी सेंट्रल नाका एमजीएम रोड ते एमजीएम गेट पर्यंत कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये चाळीस हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला. गजानन महाराज मंदिर फुटपाथ वरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.

सेंट्रल नाका ते एमजीएम मनियार चौक पर्यंत महानगरपालिकेने तयार केलेला सिमेंट रस्ता व फुटपाथवर काही नागरिकांनी आपल्या बंद पडलेल्या चार चाकी मोठ्या गाड्या रस्त्यावर उभ्या करून वाहतुकीला आणि नागरिकांना पायी चालल्यास अडचण निर्माण केली होती. या विरुद्ध आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. संजय नगर बायजीपुरा येथील रहिवासी यांनी आपल्या दोन दोन गाड्या रोडवर उभ्या केल्या होत्या आणि या बाबत अगोदरच सदर वाहन दहा-दहा हजार रुपये दंड आकारण्यात आलेला होता. याबाबत या रस्त्यावर नेहमी मनपा आणि सिडको शहर वाहतूक पोलीस पेट्रोलिंग च्या माध्यमाने सूचना देत होते.

परंतु त्यांनी या सूचनाकडे दुर्लक्ष केल्याने यांच्यावर आज कारवाई करण्यात आली. तसेच एमजीएम प्रवेशद्वारा लगत नागरिकांनी मेन रोडवर आपल्या दुचाकी पार्किंग केल्या होत्या. प्रथम यांना माईक भोंग्या द्वारे वाहने काढून घेणे नसता कारवाई करणे साठी सूचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील अर्धा तास कोणीही आपले वाहने काढले नाही. त्यामुळे वाहतूक पोलीसचे कर्मचारी यांनी या गाड्या डिटेक्ट केल्या आणि यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करून वरील प्रमाणे दंड केला. यामध्ये २४ दुचाकी आणि ०३ चार चाकी तीन गाड्यांचा समावेश आहे.

टाऊन सेंटर सिडको जवळ दोन चार चाकी हात गाड्या, मोमोज आणि भेलपुरी विकणाऱ्या विरुद्ध यापूर्वी कारवाई करण्यात आली होती तरी देखील आज त्यांनी पुन्हा या ठिकाणी गाड्या लावून पुन्हा अतिक्रमण करून अडथळा निर्माण केल्याने यांचेही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच उद्या आषाढी एकादशी निम्मित गजानन मंदिर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या मंदिराच्या लगत महापालिकेच्या फुटपाथवर असलेल्या १५x४० या आकाराचे अतिक्रमित पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. या अगोदर इमारत निरीक्षक यांनी वेळोवेळी अतिक्रमण काढून घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

परंतु सदर अतिक्रमण काढण्यात आले नव्हते म्हणून आज सदर शेड मधील सर्व साहित्य जप्त करून शेड जमीनदोस्त करण्यात आले.
या लगत काही फुल झाडे कुंडे व मातीचे मटके विकणारे सुद्धा यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमण धारकांना या बाबत तीन दिवसांपासून सूचना देण्यात आल्या होत्या.

पावसामुळे थोडा व्यत्यय आला होता तरी देखील त्यांच्याविरुद्ध आज कारवाई करून त्यांचे फुलझाडे चे साहित्य जप्त करून महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये ठेवण्यात आले आहेत. महानगरपालिका आणि सिडको शहर वाहतूक शाखा या भागात दररोज नागरिकांना व चार चाकी हातगाड्या व फळ विक्रेत्यांना रस्त्यावर विक्री करून वाहतुकीला आणि नागरिकांना अडथळा निर्माण करू नका असे आवाहन करण्यात येत आहे. सदर कारवाई दररोज सुरू राहणार आहे.

सदर कारवाई प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त -०२ सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त – ०१ सविता सोनवणे ,पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सिडको राजेश मयेकर, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे आणि सिडको वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!