छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

कॅनॉट प्लेसमधील फ्रुट मार्केट हटवले, मुकुंडवाडीतील मनपाच्या ओपन स्पेसमधील अतिक्रमण काढले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सातत्याने प्रशासक तथा आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे.

आज महानगरपालिका अतिक्रमण विभागा तर्फे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंडवाडी भाजी मंडई व मंडई लगत असलेल्या महानगरपालिका ओपन स्पेस वरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणारे अतिक्रमणे काढण्यात आले. यात सात हातगाड्या हटविण्यात येऊन एक हातगाडी जप्त करण्यात आली. तसेच दोन ओटे जमीनदोस्त करण्यात येऊन १० ते १२ अतिक्रमण शेड काढण्यात आले.

तसेच सिडको येथील जी एस टी कार्यालयाच्या बाजूस असलेले अनधिकृत फ्रुट मार्केट हटविण्यात आले. सदर कारवाई पद निर्देशित अधिकारी वसंत भोये,इमारत निरीक्षक सागर श्रेष्ठ, पंडित गवळी,मझहर अली,अशोक कदम व अतिक्रमण पथकाचे कर्मचारी यांनी केली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!