छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

श्वान परवाना काढून घ्या अन्यथा जप्तीची कारवाई ! विना परवाना श्वान बाळगल्यास आता दंडात्मक कारवाई !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – मुंबई प्रांतिक महानगरपालिका, अधिनियम १९४९ चे कलम १२७(२), (क) ४५७, (१३) अन्वये महानगरपालिका हद्दित पाळीव श्वान बाळगण्यासाठी श्वान परवाना हस्तगत करणे बंधनकारक आहे. सर्व संबधीतांनी तात्काळ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पशुचिकीत्सालय बायजीपुरा येथून (सुट्टीचे दिवस सोडून) श्वान परवानासाठी लागणारे कागदपत्रे सादर करून नवीन श्वान परवाना व नूतनीकरण करून श्वान परवाना हस्तगत करावा. अन्यथा श्वान जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच पाळीव श्वान महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय अनाधिकृत पाळले असे गृहित धरून विषेश मोहिमे अंतर्गत पाळीव श्वान नियम (११) अन्वये जप्त करण्यात येईल. व विनापरवाना श्वान बाळगल्याचे दंड व परवाना शुल्क वसुल करण्यात येईल. याची सर्व श्वान मालकांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशारा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दिला आहे.

श्वान परवाना घेण्याबाबत आवश्यक बाबी
. १. श्वान परवाना नमुना अर्ज. २. पाळीव प्राण्यांचे दोन रंगीत फोटो ( साईज ५ x ७ से.मी. ) ३. श्वान दंशक प्रतिबंधक रेबीज लस प्रमाणपत्र महानगरपालिका.
४. श्वान परवाना फी रु. ७५०/-
५. श्वान परवाना नूतनीकरण फी ७५०/-

श्वान परवाना मिळण्याचे ठिकाण
महानगरपालिका पशुचिकीत्सालय बायजीपुरा. सुट्टीचे दिवस सोडून सकाळी ०८:०० ते ०१:००.व दुपारी ०३:०० ते ०५:०० वाजे पर्यंत.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२१६६४५१४ व दुरध्वनी क्रमांक ०२४०२३०१३५४ डॉग युनिट, बायजीपूरा छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा असे प्र. पशु वैद्यकीय अधिकारी ,छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!