महाराष्ट्र
Trending

शेतकरी नवरा गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, भगिनीने हंबरडा फोडला ! धनंजय मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी !!

'त्या' कुटुंबाना तात्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश;आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर वाढतात - धनंजय मुंडे

यवतमाळ दि. १९  – जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यवतमाळ दौऱ्यावर असताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हे जाहीर केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचे कुटुंबिय धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये आले होते. धनंजय मुंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडत असताना ‘त्या’ महिलांना अश्रू अनावर झाले. शेतकरी नवरा तर गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत त्या भगिनीने हंबरडा फोडला. त्यात शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे तिने धनंजय मुंडे यांना सांगितले.

तात्काळ धनंजय मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून या दोन्ही कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्याची मदत देण्याचे निर्देश दिले. राज्याचे कृषीमंत्री म्हणून काम करत असताना धनंजय मुंडे यांच्यासमोर असा प्रसंग पहिल्यांदाच आला असला तरी, मागच्या काळात अशा अनेक प्रसंगांना त्यांनी अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळलेले आहे.

त्यामुळे आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर कुटुंबापुढील प्रश्न आणखी वाढतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत, असे भावनिक आवाहनही धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!