महाराष्ट्र
Trending

शेतीच्या वादातून गज, काठी व कुऱ्हाडीने हल्ला, अंबड तालुक्यात तिघे जखमी ! दहीपुरी शिवारात उभ्या पिकावर रोटावेटर चालवला, १२ जणांवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९- शेतीच्या वादातून ११ ते १२ जणांनी तिघांवर कुऱ्हाड, गज व काठीने हल्ला चढवल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडली. दहीपुरी शिवारातील शेतीचा हा वाद उफाळून प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. शेती नेमकी कोणाची या संदर्भात दोघांचाही शेतीचा वाद अंबड कोर्टात सुरु आहे. दरम्यान, या घटनेत तिघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लहु बाबासाहेब शेळके (वय 32 वर्षे व्यावसाय शेती, रा. दहीपुरी ता.अंबड जि. जालना), सोमनाथ परसराम शेळके व  प्रकाश श्रीमंत शेळके अशी जखमींची नावे आहेत. लहु बाबासाहेब शेळके (वय 32 वर्षे व्यावसाय शेती, रा. दहीपुरी ता.अंबड जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दहीपुरी शिवार गट क्र 334 मध्ये 28 एक्कर 13 गुंठे शेती असुन त्यामध्ये बाजरी व तुरीचे पिक लावलेले आहे. लहु बाबासाहेब शेळके यांच्या शेता शेजारीच किसन गंगाधर लोगे (रा. राममुर्ती ता. जि. जालना) याचे शेत असून दोघांचा सामाईक बांध आहे. व त्या शेती संदर्भात अंबड कोर्टात वाद चालू आहे.

दि. 10/08/2023 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लहु बाबासाहेब शेळके व त्यांचा चुलत भाऊ प्रकाश श्रीमंत शेळके शेतात काम करत असताना त्यांच्या शेताच्या बाजुला शेत असलेले 1 ) किसन गंगाधर तोगे (रा. राममूर्ती ता. जि. जालना) व त्यांच्या सोबत 2) सखाराम आश्रुबा कुरधने 3) तुकाराम अश्रुबा कुरधने 4) अश्रुबा कुरधने (सर्व रा. डोलारा ता. परतूर जि.जालना) 5) एकनाथ भगवान मिसाळ (रा. दहीपुरी ता. अंबड जि.जालना) हे ट्रॅक्टरसह तेथे आले. व लहु बाबासाहेब शेळके यांना म्हणाले की, ही शेती आमची आहे. असे म्हणून शिवीगाळ करून तुम्ही या शेतात कसेकाय पीक घेतले असे म्हणून शेतातील मालातून रोटा चालवून नुकसान करत असताना लहु बाबासाहेब शेळके यांनी त्यांना समजावून सांगितले की, तुम्ही असे करु नका आपला याबाबतचा वाद कोर्टात चालु आहे.

कोर्ट काय निर्णय देईल त्यानंतर आपण ठरवू असे म्हणताच त्यांनी त्यांच्या जवळ अणलेल्या काठ्या व कु-हाडीने लहु बाबासाहेब शेळके व त्यांचा चुलत भाऊ प्रकाश श्रीमंत शेळके यांना शिवीगाळ केली. किसन तोगे यांनी कु-हाडीने लहु बाबासाहेब शेळके यांना पायावर मारून जखमी केले. तसेच सखाराम कुरधने यांनी गजाने लहु बाबासाहेब शेळके यांच्या डोक्यावर मारून मुक्का मार दिला. एकनाथ मिसाळ यांनी काठीने लहु बाबासाहेब शेळके यांच्या कमरेवर मारून मुक्का मार दिला.

लहु बाबासाहेब शेळके यांचा चुलत भाऊ प्रकाश श्रीमंत शेळके यास किसन तोगे यांनी कु-हाडीने पायाला डोक्याला मारल्याने त्यांचे डोके फुटून रक्त निघाले. या मारहाणीत लहु बाबासाहेब शेळके व त्यांचा चुलत भाऊ दोघे खाली पडले. तेव्हा लहु बाबासाहेब शेळके यांचा चुलत भाऊ सोमनाथ परसराम शेळके भांडण सोडवण्यास आला असता त्यालाही गजाने कमरेवर व पायावर मारून मुक्का मार दिला. याचदरम्यान आयशर मधील अनोळखी सहा सात लोक खाली उतरले. त्यांनी पण  शिवीगाळ करुन चापटबुक्याने मारहाण केली.

तुम्ही जर परत या शेतात आले तर तुम्हाला जिवे ठार मारून टाकू अशा धमक्या दिल्या. त्यानंतर जखमी लहु बाबासाहेब शेळके हे तक्रार देण्यासाठी अंबड पोलिस स्टेशनला पोहोचले असता त्यांना प्रथम सरकारी दवाखाना अंबड येथे उपचार कामी पाठविले.  तेथील डॉक्टरांनी लहु बाबासाहेब शेळके यांना व सोमनाथ परसराम शेळके यांना उपचार कामी उपजिल्हा रुग्नालय अंबड येथेच एक दिवस अॅडमीट करून ठेवल व प्रकाश याची प्रकृती पाहून त्यास उपचारकामी सामान्य रुग्नालय जालना येथे रेफर केले.

याप्रकरणी लहु बाबासाहेब शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून 1 ) किसन गंगाधर तोगे (रा. राममूर्ती ता. जि. जालना) व त्यांच्या सोबत 2) सखाराम आश्रुबा कुरधने 3) तुकाराम अश्रुबा कुरधने 4) अश्रुबा कुरधने (सर्व रा. डोलारा ता. परतूर जि.जालना) 5) एकनाथ भगवान मिसाळ (रा. दहीपुरी ता. अंबड जि.जालना) यांच्यासह इतर अनोळखी सहा ते सात जणांवर अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!