छत्रपती संभाजीनगर
Trending

अंडा ऑम्लेटच्या गाड्या लावण्यावरून दोन गट भिडले ! पोलिसांना न जुमानता झोंबा झोंबी करू लागले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – अंडा ऑम्लेटच्या गाड्या लावण्यावरून दोन गटांत भाडण सुरु झाले. ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस त्यांची समजूत करत असतानाच ते दोन गट पुन्हा झोंबा झोंबी करू लागले. अखेर पोलिसांना पिटर मोबाईलची मदत घ्यावी लागली. त्यानंतर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल लेमन ट्री लगत सर्व्हिस रोडच्या कडेला ही घटना घडली.

सिडको पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार चंदनसिंग रामसिंग उसारे यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवाालानुसार, पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना एम.डी.टी वर माहिती मिळाली की हॉटेल लेमन ट्रीच्या सर्व्हिस रोडच्या कडेला भांडण सुरु आहे. यावरुन पोलिस अंमलदार चंदनसिंग उसारे व सहकारी पोलिस सदर ठिकाणी 22.00 वाजेच्यासुमारास घटनास्थळी पोहोचले.

अंडा ऑम्लेटच्या  गाड्या लावण्याच्या कारणावरून तेथे दोन गटांत भांडण सुरु होते. पोलिस त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांना काही एक न जुमानता ते परत एकमेकांत झोंबा झोंबी करू लागले. पोलिसांसमक्ष मारहाण करीत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून पोलिस स्टेशन सिडको पिटर मोबाईल यांना संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर सिडको पिटर मोबाईल वरील डि. ओ. अधिकारी तेथे आल्या व त्यांनी त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे पुढील प्रमाणे सांगितले :-

1) सचिन भगवान कल्याणकर वय 33 वर्षे धंदा- अंडा ऑम्लेटची गाडी चालक रा. जयभवानीनगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर 2) गिता सचिन कल्याणकर, 3) लता चरण जोनवाल, व्यवसाय अंडाऑम्लेट गाडी चालक रा. छत्रपती नगर रेल्वे स्टेशन मुकुंदवाडी महादेव मंदिराजवळ गल्ली नं.02 छत्रपती संभाजीनगर 4 ) कलमलाबाई बजरंग घुनावत असे सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी पोलिस अंमलदार चंदनसिंग रामसिंग उसारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलिस स्टेशनमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!