छत्रपती संभाजीनगर
Trending

एकोड पाचोड रोडवरील हॉटेल जगदंबाच्या मालकाने पुरून ठेवलेला गावठी कट्टा व कोयता पोलिसांनी पकडला !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८- एकोड पाचोड रोड वर खडी क्रेशरच्या पुढे चहापाणी-नाश्त्याचे हॉटेल जगदंबा पाठिमागे खड्डा करून त्यात पुरुन ठेवलेला गावठी कट्टा व कोयता चिकलठाणा पोलिसांनी शोधून काढला. लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी व गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने हॉटले जगदंबाच्या पञ्याच्या शेडच्या रुमच्या पाठीमागे एक गड्डा करून त्यात एक एक लोखंडी गावठी कट्टा व कोयता पुरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून गावठी कट्टा व कोयता जप्त केला. सुनील वैजिनाथ चंदने (वय 25 वर्षे रा. भालगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

चिकलठाणा पोलिस स्टेशनचे पोहेकॉ रविंद्र गंगाधर साळवे यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 07/07/2023 रोजी 13.51 वाजेच्या सुमारास पोहेकॉ रविंद्र साळवेव पोहेका शिंदे, पोह शेकडे, मपोना राठोड, मपोका घुगे पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याच्या केसेस करण्यासाठी शासकीय वाहनाने झाल्टा फाटा, भालगाव, एकोड-पाचोड भागामध्ये रवाना झाले.

पोलिस पथक झाल्टा फाटा येथे असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की एकोड पाचोड रोड वर खडी क्रेशरच्या पुढे चहापानी-नाश्त्याचे हॉटेल जगदंबाचे मालक सुनील चंदने यांच्याकडे एक गावठी कट्टा आहे. ही खात्रीलायक बातमी मिळ्याल्याने पोलिस पथक पंचासह हॉटेल जगदंबा येथे 14.40 वाजता धडकले. सुनिल चंदने हे हॉटेलवरती होते.

त्यांना गावठी कट्ट्याबाबत विचारपूस केली असता सुनिल चंदणे यांनी सांगितले की, तो गावठी कट्टा त्यांनी त्यांच्या पत्र्याच्या शेडच्या रुमच्या पाठीमागे एक गड्डा करून तसेच त्याच्या सोबत एक कोयता पुरून ठेवला आहे. सुनील चंदणे यांनी त्यांच्या जगदंबा हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडच्या मागे पोलिसांना घेऊन गेले. तेथे गड्डा करुन पुरलेला गावठी कट्टा व एक कोयता पंचासमक्ष काढून दिला.

याप्रकरणी पोहेकॉ रविंद्र गंगाधर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगदंबा हॉटेलचे मालक सुनील वैजिनाथ चंदने (वय 25 वर्षे रा. भालगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!