Uncategorizedछत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगरकरांना एका क्लिकवर मिळतेय आजच्या पाणी वितरणाची माहिती ! मोबाईल नंबर रजिस्टर करून SMS द्वारे मिळवा पाणी वेळेची माहिती !!

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी अंतर्गत 'जल बेल' ॲप

छत्रपती संभाजीनगर, दि. २२: शहरातील पाणी वितरणाची माहिती मिळण्याकरिता छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी अंतर्गत ‘जल बेल’ ॲप बनविण्यात आले आहे. 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जल बेल नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ अभिजित चौधरी ह्यांचा मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल सेंटर मधून संचालित जल बेल ॲप द्वारे नागरिकांना पाणी पुरवठ्याची विस्तृत माहिती मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून पाणी पुरवठा वेळेची पडताळणी आता नागरिकांमार्फतही होणार आहे.

पाणी पुरवठा येऊन गेल्यानंतर जल बेल ॲपवर सूचना देण्यात येणार असून यात नागरिकांना पाणी वेळेत आले होते का नाही तसेच उशीर झाला असेल तर किती उशीर झाला अशी प्रतिक्रिया मांडता येणार आहे. नागरिकांच्या या प्रतिक्रियेमुळे पाणी वितरण वेळेची अचूकता वाढविण्यास मदत मिळू शकते.

प्रकल्प व्यवस्थापक फैज अली ह्यांनी सांगितले की आजवर शहरातील 30,000 नागरिक या ॲपशी जोडली गेली आहेत. तसेच पाणी वेळेची माहिती आता SMS द्वारे मिळणार आहे. विशेष म्हणजे जल बेल ॲप तयार करण्यासाठी स्थानिक स्टार्ट उप चालवणाऱ्या तरुण निलेश लोणकर ला स्मार्ट सिटीने संधी दिली होती. आणि त्याचे उत्तम परिणाम प्राप्त होत आहे.

SMS द्वारे मिळवा पाणी वेळेची माहिती

पाणी वेळेची सूचना आता नागरिकांच्या मोबाइलवरही SMS द्वारे उपलब्ध होणार आहे. SMS सेवा सुरू करण्याकरिता नागरिकांना आपल्याला जल बेल ॲपमध्ये एसएमएस सुविधे साठी मोबाइल नंबर नोंदवावा लागेल. यासाठी मदत हवी असल्यास नागरिक 155304 या नंबर वर कॉल करून मदत घेऊ शकतात.

Back to top button
error: Content is protected !!