महाराष्ट्र
Trending

जालन्याच्या सामान्य रुग्णालयात राडा, वैद्यकीय अधिकाऱ्याची कॉलर पकडली ! उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक आक्रमक, डॉक्टरांना मारण्यासाठी सलाईन स्टॅंड उचलले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – उपचारादरम्यान महिलेच्या मृत्यू झाल्याने जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात राडा झाला. मृत महिलेच्या नातेवाईक दोन महिला आक्रमक झाल्या त्यांनी कॉलर पकडून वैद्यकीय अधिकार्यांना मारण्यासाठी सलाईन चढवण्याचे लोखंडी स्टॅंड उचलल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजु शेषराव जाधव (वय 38, अपघात विभाग, रा.यशवंत नगर जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार दिनांक 02/10/2020 रोजी वैद्यकीय अधिकारी म्हणून 20.00 ते दिनांक 03/10/2023 रोजी 08.00 पर्यंत ड्युटी होती. सायंकाळी 17.15 वाजेच्या सुमारास शशिकला सुदाम बांबडे (वय 65 वर्षे, अंदाजे रा. जाफराबाद जि. जालना) यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारकामी दाखल केले होते.

उपचार चालु असताना यातील रुग्ण हे 22.20 वाजेच्या सुमारास मृत झाले. रुग्णासोबत असलेल्या नातेवाईक महिला 1 ) वंदना किशोर साबळे (रा. कन्हैया नगर जालना), 2) सीमा किशोर मघाडे (रा. जाफराबाद) या दोघींनी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजु शेषराव जाधव यांची कॉलर पकडली व मला शिवीगाळ केली.

डॉ. राजू जाधव यांच्या सोबत असलेल्या सिस्टर दीपाली कल्याणकर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी काही ऐकले नाही. सलाईन लावण्याचा लोखंडी स्टॅन्ड उचलून डॉ. राजू जाधव यांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर आले. त्यांनंतर शिकावू डॉ. प्रदयुम पवार यांनी स्टॅन्ड पकडून बाजुला केला. तेव्हा तेथे अॅम्बुलन्स चालक हे आले व सदर महिलांना बाजुला करून डॉ. राजू जाधव यांना बाहेर घेवून गेले. वार्ड क्र.56 मध्ये शिविगाळ केली. त्यानंतर तू येथुन हालू नको, मी तुला सोडणार नाही असे धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजु शेषराव जाधव (वय 38, अपघात विभाग, रा.यशवंत नगर जालना) याप्रकरणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस स्टेशनमध्ये 1 ) वंदना किशोर साबळे (रा. कन्हैया नगर जालना), 2) सीमा किशोर मघाडे (रा. जाफराबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!