महाराष्ट्र

अजितदादांचा पॉवर गेम: पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, चंद्रकांत पाटलांची अमरावतीला उचलबांगडी ! धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर !!

मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थामुळे अजितदादा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले होते. त्यामुळे राजकीय गोटात अजितदादा नाराज असल्याची चर्चा रंगत असतानाच आज ही पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर झाल्यामुळे पुन्हा एकदा अजितदादांनी आपल्या मनासारखा जिल्हा पदरात पाडून घेतला असल्याची चर्चा होत आहे.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-

पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- डॉ.विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे
नंदुरबार- अनिल पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Back to top button
error: Content is protected !!