महाराष्ट्र
Trending

तहसीलदाराने रेशन दुकानदारांकडून तीन महिन्यांचा हप्ता मागितला ! नऊ हजारांची लाच मागितली म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- रास्त भाव धान्य दुकानाच्या धान्य मागणीपत्रावर सही करण्यासाठी व दुकानावर कारवाई न करण्यासाठी तत्कालीन तहसीलदाराने नऊ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

राजाराम इरण्णा केलुरकर (वय – 56 वर्षे, रा. श्री आई निवास, लक्ष्मी धाम काँलनी, लातूर (तत्कालीन नायब तहसीलदार, पुरवठा, उस्मानाबाद. सध्या नेमणूक तहसील कार्यालय उमरगा. वर्ग 2) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार व त्यांचे 02 मित्र यांचे रास्त भाव धान्य दुकानाच्या धान्य मागणीपत्रावर सही करण्यासाठी व दुकानावर कारवाई न करण्यासाठी यातील आरोपीने तिघांचा 03 महिन्याचा मासीक हप्ता असे एकूण 9000/- रूपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. दिनांक – 19/05/2023, 04/09/2023 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि., विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. धाराशिव, सापळा पथक – पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके, नागेश शेरकर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!