छत्रपती संभाजीनगर
Trending

कॅनॉट प्लेसला राडा, MG हेक्टर गाडीतून आलेल्या पोरांनी लोखंडी रॉडने सपासप वार केले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – शहरातील प्रसिद्ध कॅनॉट प्लेसमध्ये राडा झाला. सुरुवातीला शिवीगाळ झाली. त्यानंतर एकाने फोन करून मित्रांना बोलावले. MG हेक्टर गाडीतून आलेल्या पोरांनी लोखंडी रॉडने सपासप वार केल्याची घटना कॅनॉट प्लेस परिसरात घडली. यात एक युवक जखमी झाला.

नितीन भिवसन गवळी (वय 24वर्षे धंदा खा. नोकरी रा. भारतनगर, गारखेडा परिसर, गल्ली नं. 09, साई निवास क्लिनिक जवळ औरंगाबाद) असे जखमीचे नाव आहे.  MGM हॉस्पिटल येथे तो दाखल असून त्याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दि. 31/12/2022 रोजी नितीन गवळी हा सायकाळी 05.30 वाजेच्या सुमारास कॅनॉट प्लेस येथे पाटील चॅट स्नेक येथे चॅट खाण्यासाठी गेला होता.

तेव्हा तेथील मनोज पाटील यांनी नितीन गवळी यास जागेवरून शिवीगाळ करीत होता. यावर नितीन गवळी याने त्यास विचारपूस केली असता त्याने तू थांब थोडा वेळ तुला दाखवतो असे म्हणून शिवीगाळ करीत होता. यामुळे नितीन गवळी याने देखील त्यास शिवीगाळ केली. याचा त्याला राग आल्याने त्याने फोन करुन अविनाश पवार व रघुनाथ शिंदे यांना बोलावून घेतले.

त्यानंतर अविनाश पवार, रघुनाथ शिंदे यांनी नितीन गवळी यास हाताचपाटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानतंर रघुनाथ शिंदे यांने MGहेक्टर गाडीतून लोखंडी रॉड काढून नितीन गवळीच्या पाठीवर, मानेवर हातावर पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले.

या मारहाणीत नितीन गवळी याच्या कंपाळावर डोळ्याच्या वर उजव्या बाजुस रॉडचा मार लागल्याने 2 टाके पडले तसेच उजव्या पायावर रॉडने मारल्यामुळे 4 टाके पडले. तसेच नितीन गवळी यास मारहाण करत असताना तेथे त्यांचे इतर साथीदार 12 ते 15 लोक आले होते. त्यांनी शिव्या दिल्या.

दरम्यान, नितीन गवळी यास मार लागल्याने त्याचे दोन मित्र तेथे आल्याने त्यांनी भांडण सोडविले त्यांनतर MGM हॉस्पिटल येथे पुढील उपचार कामी दाखल केले. डॉक्टरानी नितीन गवळी याच्या कपाळावर उजव्या बाजुस व उजव्या पायाच्या नडगीवर टाके घातले.

दि. 31/12/2022 रोजी सायंकाळी 05.30 वाजता कॅनॉट प्लेस येथे मारहाण मारहाण केल्याच्या नितीन गवळी याच्या तक्रारीवरून मनोज पाटील, रघुनाथ शिंदे, अविनाश पवार व इतर अनोळखी 12 ते 15 लोकांविरुध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!