गंगापूरछत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

प्रेमसंबंधातून नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या ! शिक्षकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची आईची तक्रार, गंगापूर तालुक्यातील घटनेने खळबळ !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – मुलगी शिकत असलेल्या कै. दादासाहेब चव्हाण पाटील इग्रंजी विद्यालयातील शिक्षकाने मुलीला वारंवार फोन करून त्रास दिला. तसेच ती अल्पवयीन असल्याचे माहित असातांना सुध्दा तिच्याची प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद मुलीच्या आईने पोलिसांत दिली आहे.

अजय जयवंत सासवडे (ह. मु. कै दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयात, आसेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भाद आईने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, सदर मुलगी इयता 9 वी मध्ये कै. दादासाहेब चव्हाण पाटील इयंजी विद्यालयात असेगाव येथे शिक्षण घेत होती. मागील वर्षी 14 जानेवारी 2023 ला सदर मुलीच्या आईने कै. दादासाहेब चव्हाण पाटील इयंजी वि‌द्यालयात जावून माहिती घेतली असता त्यांना शाळेतून कळाले होते की, त्यांच्या मुलीचे व शाळेचे शिक्षक अजय सासवडे यांचे काहीतरी संबंध आहे. हे एकून मुलीच्या आईला धक्का बसला.

त्याचवेळी त्यांनी मुलीची टिसी देणेबाबत विनंती केली. मात्र, तुमची मुलगी हुशार आहे तिची टिसी काढून घेवू नका, अशी विनंती शाळेने केली. त्यानंतर सदर मुलीची आई घरी परतली. घरी पोहोचल्यावर त्यांनी मुलीला काय झाले असे विचारले असता तिने काहीही झालेले नाही असे आईला सांगितले. त्यानंतर दि. 17/05/2023 रोजी मुलीची आई नेहमीप्रमाणे सकाळी 10.00 वाजता घरून कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यामुळे मुलगी घरी एकटी होती.

आईने मुलीला दुपारच्या सुमारास मोबाईल केला मात्र तिने रिसिव्ह केला नाही. सायंकाळी 17.00 वाजेच्या दरम्यान आई कामावरून घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर दरवाज्याचा कडीकोंडा तोडुन घराच्या आत प्रवेश केला असता घराच्या छताला ओढणीने  गळफास घेवून मुलगी लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. नातेवाइकांच्या उपस्थितीत रिती रिवाजाप्रमाणे मुलीचा अत्यविधी केला.

दरम्यान, मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, अजय सासवडे यांनी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असाताना सुध्दा तिच्याशी प्रेमसंबंध करण्याचा प्रयत्न केला व मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. मृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कै. दादासाहेब चव्हाण पाटील इग्रंजी विद्यालयात असेगाव चे शिक्षक अजय सासवडे यांच्यावर दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि पारधे करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!