छत्रपती संभाजीनगर
Trending

महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ महेश मुळेकर यांना जीवे मारण्याची धमकी, थकबाकीदार ग्राहकावर गुन्हा !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २९- : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास थकबाकीदार ग्राहकाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर ई सेक्टरमधील रहिवासी असलेल्या शेख अफसर शेख गफूर पटेल या ग्राहकाकडे वीजबिलाची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी मंगळवारी दुपारी महावितरणचे पथक गेले होते. त्यावेळी आरोपीने महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ महेश मुळेकर यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच शासकीय कामात अडथळा आणला. यानंतर मुळेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तातडीने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दिली. त्यावरून आरोपी शेख अफसर शेख गफूर पटेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!