महाराष्ट्र
Trending

जालन्यात क्रिप्टो करंसीच्या नावाखाली 116 जणांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, चौघे जेरबंद ! महागड्या कार जप्त, ५ कोटी ८८ लाखांची रक्कम निष्पन्न !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवून रक्कमेच्या ११ टक्के दरमहा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची माया जमा करून पसार झालेल्या चौघांच्या मुसक्या जालना आर्थिक गुन्हे शाखेने आवळल्या. २ तपास पथकांनी ही कारवाई केली असून वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तपासातून एकूण ५,८८,००,०००/- रुपये एवढी रक्कम निष्पन्न झालेली आहे. दरम्यान, गुन्हयाच्या तपासा दरम्यान अद्यापपर्यंत ११६ लोकांची एकूण २,६९,००,०००/- रुपयांची फसवणुक झाल्याच्या तक्रारी रेकॉर्डवर प्राप्त झालेल्या आहेत.

०३ लॅपटॉप, ०३ संगणक, ०९ महागडे मोबाईल, फसवणुक केलेल्या रक्कमेतून खरेदी केलेल्या महागड्या गाडया (चारचाकी वाहने) जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तुंची अंदाजे किं. २,४४,००,०००/- असून सदर गुन्हयात आरोपींचे व त्यांच्या नातेवाईकांचे विविध बँक खात्यामध्ये एकूण ३,४४,००,०००/- रुपये गोठवण्यात आलेले आहेत. असे एकूण आजपावेतो झालेल्या तपासात एकूण ५,८८,००,०००/- रुपये एवढी रक्कम निष्पन्न झालेली आहे. या गुन्हयामध्ये अद्यापपर्यंत ०४ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती जालना आर्थिक गुन्हे शाखेचे प्र. पोलीस उप अधीक्षक बी.डी. फुंदे यांनी संभाजीनगर लाईव्हला दिली.

प्र. पोलीस उप अधीक्षक बी.डी. फुंदे यांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस ठाणे तालुका जालना मार्च २०२२ ते दिनांक १६.०१.२०२३ दरम्यान या गुन्हयातील आरोपी किरण खरात व त्यांची पत्नी दिप्ती खरात (रा. सराफा नगर मिसाळ हॉस्पिटलचे पाठीमागे जालना) व त्यांचे इतर सहकारी यांनी पूर्व नियोजित कट करुन फिर्यादीना विश्वासात घेतले. क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवणुक करून तुम्हाला तुम्ही गुंतविलेल्या रक्कमेच्या ११ टक्के दरमहा देण्याचे आमिष दाखवले. करंसी लॉन्च झाल्यानंतर त्याची भारतीय रुपयाच्या तुलनेत अनेक पटीने परतावा मिळून देतो असे आमिष देऊन फिर्यादी कडून १२,५०,०००/- घेऊन आर्थिक फसवणुक केली.

त्यानंतर त्याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे ऋषीकेश शेषराव काळे (रा. जुना जालना ता. जि. जालना) यांच्या फियादीवरून, पोलिस स्टेशन तालुका जालना येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखे मार्फत करण्यात येत आहे. गुन्हयाच्या तपासा दरम्यान अद्यापपर्यंत ११६ लोकांची एकूण २,६९,००,०००/- रुपयांची फसवणुक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

हा गुन्हा तांत्रिक दृष्टया अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा असल्याने पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन गुन्हयातील आरोपीतांच्या शोध कामी तपास पथके तयार करण्यात आली. सदर गुन्हयात वापरण्यात आलेली बनावट वेबसाईट बनवून त्याचा गैरवापर होत असल्याबाबत तपासात निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयातील वेबसाईट वापरणारे आरोपी हे पुणे व इचलकरंजी (ता.जि. कोल्हापूर महाराष्ट्र) व गुजरात राज्य येथील असल्याच्या खात्रीशीर माहीती मिळाली. त्यावरून दिनांक ०२.०२.२०२३ रोजी २ तपास पथके पुणे येथे रवाना करण्यात आले होते. सदर तपास पथकाने आरोपी गुन्हा करत असलेल्या ठिकाणी छापा टाकून वेगवेगळ्या ठिकाणाहून ०४ जणांना ताब्यात घेतले.

सदर ठिकाणाची तसेच त्यांच्या घराची झडती घेतली व त्यांचेकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनीच केलेला असल्याचे निष्पन्न झाले. झडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून गुन्हा करतांना वापरण्यात आलेले ०३ लॅपटॉप व ०३ संगणक व ०९ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तसेच, आरोपीतांनी फसवणुक केलेल्या रक्कमेतून खरेदी केलेल्या महागड्या गाडया (चारचाकी वाहने) जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तुंची अंदाजे किं. २,४४,००,०००/- असून सदर गुन्हयात आरोपींचे व त्यांच्या नातेवाईकांचे विविध बँक खात्यामध्ये एकूण ३,४४,००,०००/- रुपये गोठवण्यात आलेले आहेत.

असे एकूण आजपावेतो झालेल्या तपासात एकूण ५,८८,००,०००/- रुपये एवढी रक्कम निष्पन्न झालेली आहे. या गुन्हयामध्ये अद्यापपावेतो ०४ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जालना डॉ. अक्षय शिंदे, प्र. पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा बी.डी. फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर पायघन, सपोनि संभाजी वडते, पोना फुलसिंग गुसिंगे, मपोना मंगला लोणकर, पो. अंमलदार श्रीकुमार आडेप, ज्ञानेश्वर खराडे, पोना सागर बाविस्कर, पो.ह. संभाजी तनपुरे, पो.ह. गोपाल गोसिक, पो. अं. धिरज भोसले आर्थिक गुन्हे शाखा जालना यांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर पायघन करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!