जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना विभागीय चौकशी समितीची क्लिन चिट ! दहा जणांची साक्ष व फुटेज ठरले महत्त्वपूर्ण !!

औरंगाबाद, दि.२३ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नेमण्यात आलेल्या विभागीय चौकशी समितीने जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना ’क्लिन चिट’ दिली.
या संदर्भात विभागीय चौकशी समितीच्या साक्षांकित अहवालाची प्रत नुकतीच प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, ६ सप्टेंबर २०२१ रोजी वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागात शिक्षण घेत असलेल्या महिलेने जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्या संदर्भात अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तसेच कुलगुरु यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
जनसंपर्क कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेले असता मास्क काढण्यास सांगितले तसेच व्हॉटसअप चैटींग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या संदर्भात कुलगुरु यांनी माजी न्या.ए.टी.ए.के.शेख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली.
समितीने दहा जणांच्या साक्षी तपासून तसेच जनसंपर्क कार्यालयातील व्हिडीओ फुटेज तपासले. या संपूर्ण चौकशीत काहीही गैरकृत्य घडले नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे चौकशी समितीने या संपूर्ण प्रकरणातून संजय शिंदे यांना ’क्लिन चिट’ दिली आहे.