छत्रपती संभाजीनगर

Abortion: औरंगाबादमध्ये अवैध गर्भपाताने धोपटेश्वरच्या महिलेचा मृत्यू, होणाजीनगरमधील चक्क अपार्टमेंटमध्येच गर्भपात, डॉ. जैस्वालसह नर्सवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – अवैधरित्या गर्भपात (abortion) केल्याने धोपटेश्वर येथील महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. होणाजीनगर परिसरातील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये गर्भपात (abortion) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गर्भलिंग निदान चाचणी करून तिसरीही मुलगीच असल्याने केलेला गर्भपात (abortion) महिलेच्या जीवावर बेतला आहे. दरम्यान, गर्भलिंग निदानासह गर्भपात (abortion) करणारे रॅकेट असण्याची शक्यता या धक्कादायक प्रकारामुळे बळावली असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे. बीड जिल्ह्यातील परळीचे राज्यभर गाजणारे प्रकरण आणि अलिकडेच औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी उघडकीस आलेले अवैध दवाखाने यामुळे याची पाळेमुळे खोलवर रुजलेली असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याप्रकरणी डॉक्टर जैस्वाल, नर्स सविता सोमीनाथ थोरात (आदित्य अपार्टमेंट, होणाजीनगर, औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भपातामुळे (abortion) मृत्यू झालेल्या महिलेच्या जावाने दिल्या फिर्यादीवरून गर्भपाताचा हा प्रकार समोर आला आहे.

मृत महिलेच्या जाऊने पोलिसांना सांगितलेली माहिती अशी की, त्या धोपटेश्वर (ता. जि. औरंगाबाद) येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारी त्यांची लहान जाऊ व दिर राहतात. मृत महिलेने कुठेतरी सोनोग्राफी करून लिंग निदान चाचणी केली होती व त्यांना मुलीचा गर्भ असल्याबाबत माहित झाले होते.

दि. 09/10/2022 रोजी सकाळी 10.00 वाजेच्या सुमारास पोटात दुखत असल्याची माहिती तिच्या जाऊकडे म्हणजेच फिर्यादीकडे मृत महिलेने केली. मृत महिलेच्या ओळखीचे डॉ. जैस्वाल यांच्याकडे उपचारासाठी धोपटेश्वर येथून औरंगाबाद येथे जटवाडा रोड राधास्वामी कॉलनी येथे मृत महिला व तिचा पती पोहोचले. मृत महिलेची जाऊही त्या ठिकाणी रिक्षाने पोहोचली.

गणेश मेडिकल जवळ त्या दोघी थांबलेल्या असतांना तेथे एक बाई आली व दोघींना होणाजीनगर आदित्य अपार्टमेन्ट येथे घेवून गेली. लिफ्टने त्या अपार्टमेन्ट मधील फ्लॅट नं 05 च्या समोर त्या दोघी थांबल्या तेव्हा त्या फ्लॅटचा दरवाजा एका मुलीने उघडला. मृत महिला व तिची जाऊ फ्लॅटच्या आत गेल्या. त्या बाईने मृत महिलेल्या गोळ्या दिल्या. तत्पूर्वी तिच्या जाऊला त्यांनी हॉलमध्ये बसवून ठेवले होते.

त्यानंतर जाऊने म्हणजेच फिर्यादीने मृत ताराला विचारले आपण दवाखान्यात जाणार होतो, त्यावर मृत महिलेने सांगितले या बाई नर्स आहेत. त्यांना पोटाचे दुखने चांगले समजते असे सांगितले. त्यानंतर बेडरुम मधील एका बेडवर मृत महिलेला झोपू घातले. जाऊने त्या बाईला विचारले की, डॉक्टर कधी येणार, ती म्हणाली जैस्वाल डॉक्टर येतील. त्यानंतर दोन तीन तासानंतर डॉक्टर आले.

त्यांनी मृत महिलेला तपासले. काही वेळानंतर एक बाई फ्लॅट मध्ये आली ती घरातील साफ सफाई करु लागली.  दरम्यान डॉक्टरांनी मृत महिलेला अशक्तपणा आहे तुम्ही येथेच थांबा व उपचार झाल्यानंतर तीला घरी घेवून जा. मृत महिलेला अशक्तपणा वाटत असल्याने तिची जाऊही रात्री तेथेच थांबली.

 दि. 10/10/2022 रोजी सकाळी 06.00 वाजेच्या सुमारास दोघींना घरी जाण्यास सांगितल्याने मृत महिलेच्या पतीला बोलावून घेतले व तिघे गाडीने त्यांच्या गावी धोपटेश्वर येथे पोहोचले. त्यानंतर मृत महिलेने तिच्या जाऊला सांगितले की, डॉक्टरांनी माझा गर्भपात (abortion) केला आहे. तेव्हा मृत महिलेच्या जाऊला सगळी हकीकत कळाली. पोटात दुखत नव्हते तर तिला गर्भपात (abortion) करायचा होता म्हणून ती औरंगाबाद येथे डॉक्टरांकडे घेवून गेली होती.

दरम्यान, काही वेळे नंतर मृत महिलेने जेवण केले व आराम केला. दि. 10/10/2022 रोजी दुपारी 02.00 वाजेच्या सुमारास तिला चक्कर आली व रक्तस्त्राव होवू लागल्याने मृत महिलेने डॉक्टरांना फोन करायला सांगितल्याने मोबाईल मध्ये डॉ. जैस्वाल या नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकावर डॉक्टरांना फोन केला असता मृत महिलेला उपचारासाठी घेवून येण्यास डॉक्टरांनी सांगितले. मृत महिलेली मोठी बहीण व तिचा मोठा मेहुना असे मृत महिलेला घेवून औरंगाबाद येथे गेले.

त्यांनतर तिच्या जाऊला समजले की त्यांनी तिला घाटी दवाखाना येथे दाखल केले. तिच्यावर उपचार चालु असतांना दि. 12/10/2022 रोजी तिची प्रृकृती बिघडल्याने ती दुपारी 13.30 वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अवैध गर्भपातमुळे (abortion) मृत्यू झाल्याची तक्रार मृत महिलेच्या जाऊबाईने बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये दिली असून डॉक्टर जैस्वाल, नर्स सविता सोमीनाथ थोरात (आदित्य अपार्टमेंट, होणाजीनगर, औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेगमपुरा पोलिस स्टेशनचे पोउपनि बोडखे करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!