महाराष्ट्र
Trending

पैठण फाटा, शहागडला हिंदु जनआक्रोश मोर्चामुळे बीडकडे जाणारी वाहतूक वळवली ! धुळे सोलापूर महामार्गावर असा असेल पर्यायी मार्ग !!

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील वाहतूक मार्गात बदल

संभाजीनगर लाईव्ह, दि. 28- पैठण फाटा, शहागडला हिंदु जनआक्रोश मोर्चामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 रोड वरील जड वाहनांच्या वाहतूक मार्गात मंगळवार दि.29 रोजी बदल करण्यात आला आहे. मंगळवार दि. 29 रोजी सकाळी 8 वा ते सायं.6 वा. पर्यंत या मार्गाने जाणारी सोलापूर-धुळे छत्रपती संभाजीनगर- पाचोड-शहागड-बीड कडे जाणारी सर्व जड वाहने पाचोड-पैठण-उमापूर-बीड या पर्यायी मार्गाने जातील.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 सोलापुर-धुळे बीड-शहागड-पाचोड-छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व जड वाहने बीड-उमापुर-पैठण-पाचोड या पर्यायी मार्गाने जातील, असे आदेश पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.

हिंदु जनआक्रोश मोर्चामुळे वाहतुक व्यवस्थेत बदल- जालना जिल्हयातील पोलीस ठाणे गोंदी हददीतील मौजे पैठण फाटा, शहागड येथे दिनांक २९/०८/२०२३ मंगळवार रोजी सकाळी १०.०० वाजे पासून ते १८.०० वाजेपर्यंत सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आंदोलन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ रोडचे लगत मौजे पैठण फाटा, शहागड येथे नियोजित आहे. या आंदोलनाचे दरम्यान आंदोलक हे राष्ट्रीय महामार्ग अडविण्याची दाट शक्यता आहे. सदर राष्ट्रीय महामार्गावर जालना जिल्हयातून वाहतूक वळविणे शक्य नसल्याने व ती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हयाच्या हद्दीतून पर्यायी मार्गाने वळवणे वाहतुकीच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे.

त्यामुळे सदर मार्गावरून जाणारी सर्व जड वाहनासह इतर वाहनांची वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने याठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचे नियामन व नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होवू नये म्हणुन मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी दि.२९/०८/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजे पासून ते दि.२९/०८/२०१३ चे १८.०० वाजे पर्यंत सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतुक व्यवस्थेत हा बदल केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!