देश\विदेश
Trending

दिव्यांग व्यक्तींना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार, या तारखेपर्यंत येथे करा अर्ज !

दिव्यांग व्यक्तीनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

संभाजीनगर लाईव्ह, दि. 11 -: केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करिता नामांकन व अर्ज मागविण्यात आले आहेत. गृहकामकाज मंत्रालयाच्या केंद्रीकृत पोर्टलवर (https://www.awards.gov.in/) केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज, नामांकने सादर करणेकरिता संकेतस्थळ दि. 31 जुलै 2023 पर्यंत सुरु राहील.

https://www.awards.gov.in/ या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्द्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. असे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुदर्शन तुपे यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!