छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

दिव्यांगांच्या बँकेच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी PFMS खाते उघडणार !

संभाजीनगर लाईव्ह, दि.३० – दिव्यांगांच्या बँकेच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी व सर्व व्यवहार सुसंगत होण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने PFMS खाते उघडण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्टसिटी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दिव्यांगांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी आज प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिव्यांगांसाठी स्वतंत्र PFMS खाते उघडण्यात येणार आहे जेणे करून त्यांचे बँक संदर्भातील सर्व व्यवहार सुसंगत पणे होणार आहे.

या बैठकीत उप आयुक्त नंदा गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहूळे, आय डी बी आय बँकेचे अधिकारी, संजय गांधी निराधार योजनेचे उप जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाचे कर्मचारी, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!