छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सोमवारपासून

प्रथम वर्षाच्या परीक्षाही वेळापत्रकानुसारच

छत्रपती संभाजीनगर, दि.२५ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा सोमवारपासून सुरु होणार आहेत. या परीक्षेच्या वेळापत्रक कसलाही बदल होणार नाही, असे मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

पहिल्या टप्प्यात २१ मार्चपासून बी.ए, बी.एस्सी व बी.कॉम या परापरागत अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. तर प्रथम वर्ष द्वितीय सत्राच्या परीक्षा २८ मार्चपासून होणार आहेत.  यात केंद्रावर २४६ सह केंद्रप्रमुख आहेत. तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी १५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी २२ केंद्र असून २७ केंद्रावर मुल्याकंनाचे काम करण्यात येणार आहे.

या परीक्षेच्या तयारी संदर्भात प्राचार्यांची ऑनलाईन शनिवारी (दि. २५) बैठक घेण्यात आली, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!