डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: फाईव्ह ट्रिलीयन इकॉनॉमी’वर वाणिज्य परिषदेत मंथन !

- अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे आज उद्घाटन
- दीड हजार प्रतिनिधीचा सहभाग
औरंगाबाद, दि.२१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात होत असलेल्या ७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेची जय्यत तयारी झाली आहे. या परिषदेत भारताची ’फाईव्ह ट्रिलीयन इकॉनॉमी’कडे वाटचाल यासह विविध विषयावर मंथन होणार असून दीड हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या परिषदेच्या आयोजनासंदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात बुधवारी दि.२१ पत्रकार परिषद घेण्यात आली. योवेळी कुलगुरु प्रा.जी.पी.प्रसेन (केंद्रीय विद्यापीठ, त्रिपूरा), प्रा.रमेश मंगल (इंदोर), ’इंडियन कॉमर्स असोसिएशन’चे सचिव डॉ.पुष्पेंद्र मिश्रा, ’एमजीएम’विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास सपकाळ, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, ’आयसीए’चे माजी उपाध्यक्ष प्रा.मानस पांडेय, कोषाध्यक्ष प्रा.नवले किशोर, संयोजन समिती सचिव डॉ.वाल्मिक सरवदे, समन्वयक तथा विभागप्रमुख डॉ.सय्यद अझरुद्दीन, ’एमजीएम’चे कुलसचिव डॉ.अशिष गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटयगृहात २२ ते २४ डिसेंबर दरम्यान नाटयगृह तसेच विभागात होणा-या या परिषदेत सात परिसंवाद होणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या परिषदेची तयारी सुरु आहे. देशभरातून १ हजार ५४७ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
तर ’रोजगार निर्मिती डिजीटल ब्रॅडींग, मानव संसाधन विकास रणनिती, सर्वसमावेशक विकास, मार्वेâटिंग व आंतरराष्ट्रीय व्यापार आदी विषयांवर मंथन होईल तसेच विविध पारितोषिकांचे वितरण, स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे. या परिषदेत ९१२ संशोधनपर लेख प्राप्त झाले असून ५९२ पेपर्सचे प्रत्यक्ष वाचन होईल. तर ७ सत्र होणार असून १ परिसंवाद व २ स्मृती व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती डॉ.वाल्मिक सरवदे यांनी दिली. या परिषदेस एमजीएम विद्यापीठासह विविध संस्थाचे सहकार्य लाभले आहे.
उद्घाटनास मान्यवरांची उपस्थिती
या परिषदेचा उद्घाटन समारंभ गुरुवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता नाटयगृहात होईल. मा.कुलगुुरु डॉ.प्रमोद येवले हे अध्यक्षस्थान भूषविणार आहे. यावेळी मा.ना.नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री) हे ऑनलाईन मार्गदर्शन करतील. तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड, उद्योजक श्रीकांत बडवे, प्रा.सस्मिता सामंथा (अध्यक्ष आयसीए), प्रा.एच.व्यंकटेशरलू, प्रा.विलास सपकाळ (कुलगुरु, एमजीएम), प्राचार्य टी.ए.शिवारे, कुलसचिव डॉ.अशिष गाडेकर, संयोजक सचिव डॉ.वाल्मिक सरवदे व समन्वयक डॉ.सय्यद अझरुद्दीन आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, प्रा.सत्यप्रेम घुमरे, एस.जी.शिंदे, डॉ.विलास इप्पर आदींची उपस्थिती होती.
विविध ’अॅवार्डस’चे वितरण :
या परिषदेत प्रा.एम.एम.शाह मेमोरियल अॅवॉर्ड, सौरभ शिवारे, यंग रिसर्च अॅवॉर्ड, प्रा.ए.डी.शिंदे रिसर्च फेलोशिप अॅवॉर्ड, एमएमएसआर अॅवॉर्ड, बीबीएवाय अॅवॉर्ड, प्रा.समिमोद्दीन रिसर्च स्कॉलर अॅवॉर्ड घोषित करण्यात येतील, अशी माहिती आयसीएचे सचिव प्रा.पुष्पेंद्र मिश्रा यांनी दिली.