छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मैदानाच्या खासगी वापरास मनाई ! पतंग उडवल्यास गुन्हा दाखल करणार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.२६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मैदाने, क्रीडागंण, खुली जागा खासगी व्यक्ती, संस्थांनी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगी शिवाय वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

या सदंर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रसिध्दीस देण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रस्तुत विद्यापीठाची मैदाने व खुल्या जागा या खाजगी स्वरुपाच्या असून सदर मैदाने व खुल्या जागांवर विद्यापीठाच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तींनी प्रवेश करता येते नाही. सदर व्यक्तींनी प्रवेश देण्याचा किंवा नाकारण्याचा सर्वाधिकार विद्यापीठाकडे आहे.

त्यामुळे विद्यापीठाच्या मैदानावर, खुल्या जागांवर व एकंदरीत विद्यापीठ परिसरात कोणत्याही व्यक्तींनी विना परवानगी शिरकाव करुन कोणत्याही प्रकारचे पंतग उडवु नये किंवा तत्सम कारणांनी वावरु नये. विद्यापीठ परिसरात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे पतंग उडविता येणार नाही व सदर प्रकारास कायम बंदी राहील.

याउपर कोणत्याही व्यक्तींनी सदर परिपत्रक व त्यातील सूचनांचे उल्लंघन करुन विद्यापीठ परिसरात पतंग उडविला अथवा त्या उद्देशाने विद्यापीठाच्या मैदानावर किंवा खुल्या जागांवर शिरकाव केला तर अशा व्यक्तीविरुध्द तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करुन गुन्हा नोंदविला जाईल.

उक्त नमुद सुचनांच्या तात्काळ व कठोर अंमलबजावणी करीत विद्यापीठ प्रशासनातील संबंधित विभागातील अधिकारी, सुरक्षा अधिकारी व त्यांचे सुरक्षा कर्मचारी यांनी विशेष काळजी घ्यावी अन्यथा सदर बाबतील कोणताही गलथानपणा आढळुन आल्यास सदर पतंग उडविणा-या व्यक्तींसह विद्यापीठातील जबाबदारी असलेला संबंधीत अधिकारी, सुरक्षा अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांचे विरुध्द नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करुन गुन्हा नोंदविला जाईल, असेही डॉ.भगवान साखळे यांनी म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!