छत्रपती संभाजीनगर
Trending

अपात्र महाविद्यालयांची यादी घोषित: आर्दश महिला बीएड, राजश्री शाहु बीएड, अदित्य बीएडसह मराठवाड्यातील ३३ महाविद्यालयांना दणका, वाचा सविस्तर यादी !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांशी संलग्नित ३३ महाविद्यालयांना प्रवेशासाठी अपात्र ठरविण्यात निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला. चार जिल्हयातील बीएड, बीपीएड व विधि शाखेतील पात्र अपात्र महाविद्यालयांची यादी घोषित करण्यात आली आहे.

पूर्ववेळ विहित मान्यताप्राप्ता प्राचार्य, शिक्षक, पायाभूत सुविधा व कूशल मनुष्यबळचा अभाव असणा-या या ३३ महाविद्यालयांना विद्यापीठाने नाहरकत प्रमाणपत्र नाकारले आहे. शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी विद्यापीठाने हा निर्णय घेतला. राज्य शासनाच्यावतीने ’सीईटी सेल’च्या वतीने सदर प्रवेश पूर्व परीक्षा होत आहे. यामध्ये बीएड, एमएड, बीपीड, एमपीएड, एलएलएम व एलएमएज अशा सहा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

नॅशनल कॉन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशन व बार कॉन्सिल ऑफ इंडियाच्या मानकाप्रमाणे या महाविद्यालयांनी ही पूर्तता केली नाही म्हणून कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी ही मोठी कारवाई केली. यामध्ये एकूण ६१ पैकी २८ महाविद्यालयांनाच नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हयानिहाय महाविद्यालये तसेच पात्र व अपात्र महाविद्यालयांची संख्या पुढीलप्रमाणे – बीड – १७ महाविद्यालये पात्र – तीन – १४ अपात्र, औरंगाबाद २७ महाविद्यालये पात्र – १६ – अपात्र – ११, जालना ६ महाविद्यालये पात्र – पाच, अपात्र – एक, उस्मानाबाद ११ महाविद्यालये पात्र -चार, अपात्र सात याप्रमाणे कारवाई करण्यात आली. झाकीर हुसेन महा.खुलताबाद,

अपात्र ठरविण्यात आलेली महाविद्यालये पुढीलप्रमाणे –
छत्रपती संभाजीनगर जिल्हा – पदमपाणी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, ए.डी.देशमुख- खुलताबाद, पदमावती अध्यापक महा., शिवाजीराव पाटील महा.भेडाळा, जयप्रकाश नारायण अध्यापक महा., तजील अध्यापक महा.जटवाडा, धन्वश्री अध्यापक महा.गेवराई तांडा, जनता बीएड महा.खुलताबाद, महात्मा गांधी अध्यापक महा.खोकडपुरा, ज्ञानज्योती बीएड कॉलेज सोयगांव, वसंतराव काळे लॉ कॉलेज,

बीड जिल्हा – आर्दश महिला बीएड महा., राजश्री शाहु बीएड महा., अदित्य बीएड महा., अहिल्यादेवी होळकर बीएड, गडी, गुरुकूल बीएड महा., भगवानराव केदार बीएड महा, योगेश्वरी बीएड महा-कारी, माऊली विद्यापीठ बीएड महा, व्ही.डी.बीएड महा., भगवान बाबा एमएड कॉलेज-केज, केशवराज बीएड महा.-सोनेगांव, संत गजानन बीएड महा.-अंबाजोगाई.

उस्मानाबाद जिल्हा – महानंदा अध्यापक महा., श्रीकृष्णा अध्यापक महा., महारुद्र मोटे बीएड महा., श्रमजीवी अध्यापक महा.-उमारगा, रंणसम्राट बीपीएड कॉलेज -कंळब,

जालना जिल्हा – धरती जनसेवा बीएड महा.,

पात्र ठरविण्यात आलेली महाविद्यालये पुढीलप्रमाणे –
छत्रपती संभाजीनगर जिल्हा –शासकीय अध्यापक महा., मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशन, कामधेनु अध्यापक महा., फोस्टर डेव्हलेमेंट बीएड महा., श्रीराम शिक्षण मंडळाचे बीएड महा., राजबाग सवार बीएड महा., पीईएस, बीपीएड महा., महात्मा फुले बीएड महा., तलद बीएड महा., एमएसएम बीपीएड महा., डॉ.आर.एस.बीएड महा., एमपीलॉ कॉलेज, पीईएस लॉ कॉलेज.

बीड जिल्हा – नवगण बीपीएड महा., रामराव आवरगांवकर लॉ कॉलेज, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे बीएड कॉलेज – आष्टी.

उस्मानाबाद जिल्हा – बापुजी सांळुके लॉ कॉलेज, साई जनविकास बीएड महा.-अळणी, सुशीला देवी सांळुके बीएड महा.

जालना जिल्हा – मत्स्योदरी अध्यापक महा., ओम-शांत अध्यापक महा., मत्स्योदरी बीपीएड महा., मत्स्योदरी लॉ कॉलेज, डॉ.सुभाषराव ढाकणे लॉ कॉलेज.

Back to top button
error: Content is protected !!