वैजापूर
Trending

दि वैजापूर मर्चंट्स को-ऑप. बँकेवर रविंद्र संचेती यांच्या नेतृत्वाखालील १६ सदस्य संचालक मंडळ बिनविरोध !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- दि वैजापूर मर्चंट्स को-ऑप. बँकेवर रविंद्र संचेती यांच्या नेतृत्वाखालील १६ सदस्य संचालकांची बिनविरोध निवड झाली. दिवंगत बन्सीलाल संचेती यांनी व्यापारी तत्त्वावरील बँकेची स्थापना केली होती. बाळासाहेब संचेती यांनी या संस्थेचा वटवृक्ष केला. औरंगाबाद, जालना, नाशिक व अहमदनगर याठिकाणी नवीन शाखा असून सुमारे पाचशे कोटीच्या ठेवी आहेत.

दि वैजापूर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., वैजापूर समिती सदस्य निवडणूक (सन २०२३-२०२८) कार्यक्रम जाहीर झाला होता. निवडणुक कार्यक्रमानुसार दि.०१/०८/२०२३ रोजी पर्यंत प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी दि.०२/०८/२०२३ चा निकाल दि. ०३/०८/२०२३ जाहीर करण्यात आला. रविंद्र संचेती यांच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यीय संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली.

बिनविरोध ठरलेल्या उमेदवारांची नावे, मतदार संघाचे नांव पुढील प्रमाणे- गुंदेचा महेंद्रकुमार कांतीलाल (सर्वसाधारण शाखा गंगापूर सर्वसाधारण लासूर), मुथा प्रतिम प्रेमचंद (सर्वसाधारण लासूर स्टेशन), पिरथानी (अग्रवाल) प्रकाश पुनमचंद (सर्वसाधारण- कन्नड), वेद विजय वल्लभदास (सर्वसाधारण- वैजापूर), ठोंबरे विजय विश्राम (सर्वसाधारण- वैजापूर), राजपुत सावनसींग कल्याणसींग (विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाप्र), दायमा विजयकुमार जगदिश (सर्वसाधारण- जालना),

सुराणा विनय चांदमल (सर्वसाधारण औरंगाबाद), त्रिभुवन प्रशांत उत्तमराव (अनुसुचित जाती/अनुसूचित जमाती सर्वसाधारण-वैजापूर), संचेती रविंद्र बन्सीलालजी (सर्वसाधारण वैजापूर), संचेती विशाल जीवनलाल (सर्वसाधारण वैजापूर) संचेती सौरव रविंद्र (सर्वसाधारण-वैजापूर), साखरे वैशाली प्रशांत (महिला), गायकवाड विनोद काशिनाथ (इतर मागासवर्गीय), छाजेड मनोज मोहनलाल (सर्वसाधारण-वैजापूर),  सोमानी शालीनी नितीन (महिला)

अपात्र ठरलेले उमेदवार- १) व्यवहारे राजेंद्र सीताराम (इतर मागासवर्गीय) उपविधी क्र. ४० ची पुर्तता होत नसल्याने अपात्र, २) गायकवाड काशिनाथ भागाजी ( सर्वसाधारण-वैजापूर) उपविधी क्र. ४० ची पुर्तता होत नसल्याने अपात्र, ३) संचेती सरला राजेंद्रकुमार (महिला) उपविधी क्र. ४० ची पुर्तता होत नसल्याने अपात्र, ४) मगर भागीनाथ शहादु (सर्वसाधारण-वेजापूर) उपविधी क्र. ४० ची पुर्तता होत नसल्याने अपात्र, ५) खंडागळे दिगंबर आसाराम (सर्वसाधारण वैजापूर) उपविधी क्र.४० ची पुर्तता होत नसल्याने अपात्र

Back to top button
error: Content is protected !!