छत्रपती संभाजीनगर
Trending

वाल्मिकराव दळवी महाविद्यालय, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालय, सी.पी.कॉलेज ऑफ एज्यूकेशन व गोविंदराव पाटील जिवरख महाविद्यालयाची चौकशी, नोटिसाही बजावल्या !

शैक्षणिक विभागकडून चार महाविद्यालयांची चौकशी, पायाभत सुविधा, मनुष्यबळाचा अभाव, खुलासा प्राप्त झाल्यानंतर कुलगुरु घेणार सुनावणी

संभाजीनगर लाईव्ह, दि.२४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक विभागाने चार महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे. विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या भेटीत या महाविद्यालयात पायाभूत सुविधा व कूशल मनुष्यबळाचा अभाव असल्याचे अहवालत म्हटले आहे.

या संदर्भात माहिती अशी की, पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत काही महाविद्यालयात गैरप्रकार झाल्याची घटना उघडकीस आली होती तसेच काही महाविद्यालयात कसल्याही शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे चौकशी करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर चार महाविद्यालयांची चौकशी करण्यता आली. या ठिकाणी कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा अहवाल विद्यापीठाने पाठविलेल्या समित्यांनी दिला होता.

यामध्ये शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी महाविद्यालय डॉ.प्रशांत अमृतकर समिती, देवळाईतील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालय डॉ.भालचंद्र वायकर समिती , कोळवाडी येथील गोविंदराव पाटील जिवरख महाविद्यालय डॉ.सुरेश गायकवाड समिती तसेच सी.पी.कॉलेज ऑफ एज्यूकेशन डॉ.चेतना सोनकांबळे समिती या चार प्राध्यापकांच्या समित्यांनी संबंधित महाविद्यालयात भेट देऊन चौकशी केली.

संबंधित भेटीचा अहवाल त्यांनी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना सादर केला. या महाविद्यालयांमध्ये कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा तसेच अन्य आवश्यक बाबींचा अभाव आहे. त्यामुळे २५ एप्रिल पर्यंत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश शैक्षणिक विभागात दिले आहेत. या चौकशी समितीच्या अहवालाची व त्यातील निष्कर्षांची संबंधित महाविद्यालयाने गांर्भीर्याने नोंद घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी दिली.

दर्जेदार शिक्षणासाठी ठाम भुमिका : कुलगुरु
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिकणा-या विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे ही संबंधित महाविद्यालयांची नैतिक जबाबदारी आहे. प्राचार्य, प्राध्यापक भरती व तांत्रिक सुविधा बाबत वारंवार सूचनाही करण्यात आल्या आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष करणा-या संस्थाच्या विरोधात विद्यापीठ प्रशासन कडक भूमिका घेईल. गुणवतता व दर्जा या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतली आहे.

Back to top button
error: Content is protected !!