छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांनाही आता कर्मचाऱ्यांप्रमाणे बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक, रजेची नियमावलीही जाहीर !

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचा निर्णय

संभाजीनगर लाईव्ह, दि.९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुख व प्राध्यापकांना त्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे अनिवार्य करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना यापूर्वीच ’बायोमेट्रिक’ हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात विद्यापीठाच्या अस्थापना विभागाने ९ जानेवारी रोजी परिपत्रक क्र.४०/२०२२-२३ जारी केले आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

परिपत्रकात म्हटले आहे की, विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांना कळवण्यात येते की, त्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे सुरु करण्यात येत असून सर्वांनी आपली उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवरच नोंदवावी. यामध्ये आपल्या रजा या विद्यापीठाने अंमलबजावणी केलेल्या ऑनलाईन लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीम द्वारेच विभाग प्रमुखांमार्फत सादर कराव्यात.

रजा सक्षम अधिका-यांनी मंजूर केल्याशिवाय रजेवर जाऊ नये व रजेवर जाताना वरिष्ठांनी आदेशीत केलेले अधिकारी / कर्मचारी यांना आपला कार्यभार सुपूर्द करूनच रजेवर जावे. रजेवर लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीम द्वारे रुजू अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

ज्यांच्याकडे लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीम चा युजर आयडी / पासवर्ड उपलब्ध नसेल त्यांनी युनिक विभागाशी संपर्क साधून तो प्राप्त करुन घ्यावा. संबंधित विभागप्रमुखांनी लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीम मधील नोंदीबाबतचा अहवाल प्रमाणित करुन आस्थापना विभागास रुजू झाल्यानंतर ३ दिवसांत सादर करावा, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी कळवले आहे.

कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्जही ऑनलाईन
विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांना कळवण्यात येते की, दिनांक ०१ जानेवारी पासून विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचा-यांचे मासिक वेतन बायोमेट्रीक उपस्थितीशी पडताळणी करण्यात येऊन अदा करण्यात येईल याबाबत कळवण्यात येते. त्यानुषंगाने खालील सूचना देण्यात येत आहेत.

सदरील सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्व शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचा-यांनी आपली किरकोळ रजा, अर्जित रजा, वैद्यकीय रजा, लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीम द्वारे सादर कराव्यात. गट-ड मधील कर्मचा-यांच्या किरकोळ रजा, अर्जित रजा, वैद्यकीय रजा लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीम द्वारे सादर करण्यास विभागातील इतर कर्मचा-यांनी मदत करावी / तसेच याबाबत विभागप्रमुख त्यांची उपरोक्त रजा पुढील कार्यवाहीस्तव अग्रेषित करु शकतात. अर्जित रजा, वैद्यकीय रजा लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीम द्वारे रुजु अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

ज्या शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीम चा युजर आयडी / पासवर्ड उपलब्ध नसेल त्यांनी युनिक विभागाशी संपर्क साधून तो प्राप्त करुन घ्यावा. लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम मधील नोंदीबाबतचा अहवाल प्रमाणित करुन विभागप्रमुखांनी आस्थापना विभागास रुजू झाल्यानंतर ३ दिवसांत सादर करावा.

शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचा-यांचे मासिक वेतन बायोमेट्रीक उपस्थितीशी जोडणी करण्यात येणार असल्यामुळे विभागप्रमुखांनी बायोमेट्रीक उपस्थिती अहवाल विनाविलंब प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत प्रमाणित करुन देणे आवश्यक आवश्यक आहे. सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुखांनी सदर परिपत्रक आपल्या अधिनस्थ शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर त्यांनी स्वाक्षरी घ्यावी, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!