छत्रपती संभाजीनगर
Trending

सर्व महाविद्यालयांतील भरती प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय ! मराठवाड्यातील चारही जिल्ह्यांतील सर्व ४५८ महाविद्यालयांत राबवणार प्रक्रिया !!

 ’पेपर लेस ऑफीस’कडे वाटचाल

संभाजीनगर लाईव्ह, दि.११ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक भरती मान्यता संदर्भातील संपूर्ण प्रक्रिया ’ऑनलाईन’ करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. या संदर्भात ’युनिक’ विभागाने ’सॉफ्टवेअर’ विकसित केले असून ’आयसीटी’ माध्यमातून ’पेपरलेस’ ऑफीसकडे विद्यापीठाची वाटचाल सुरु आहे.

गेल्या चार वर्षांत ’फाईल ट्रॅकिंग सॉफ्टवेअर’, ’पीएच.डी प्रवेश प्रक्रिया’ महाविद्यालयांचे संलग्निकरण, पीएच.डी प्रवेश प्रक्रिया, पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रिया, कंत्राटी प्राध्यापक भरती, निवडणूक प्रक्रिया, विविध प्रकारच्या स्पर्धा, महोत्सव आदी ’ऑनलाईन’ पध्दतीने राबवण्यात येत आहे. यापुढे आता महाविद्यालयातील भरतीतील संपूर्ण मान्यता प्रक्रियाही ऑनलाईन करण्यात येणार आहे.

चारही जिल्हयातील संलग्नित सर्व ४५८ महाविद्यालयांना यात समावेश असणार आहे. या संदर्भात शैक्षणिक विभागाने परिपत्रक जारी केले आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्राअंतर्गत येणा-या सर्व संलग्नीत महाविद्यालयातील संस्था अध्यक्ष/ सचिव/महाविद्यालयाचे प्राचार्य/ संचालक यांनी कळविण्यात येते की, या विद्यापीठाशी संलग्नीत सर्व संस्था/ महाविद्यालये अंतर्गत प्राचार्य / शिक्षक व समकक्ष पदांचे पदभरतीसाठी या विद्यापीठाने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. तेव्हा यापूढे आपले संस्थेतील प्रस्तुत पदभरती करतांना जाहिरात, निवड समिती, मान्यता इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या या https://online.bamu.ac.in/unic/uni-mis/ संकेत स्थळावर सदर प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यापूढे संस्थेअतंर्गत पदभरती करतांना सदरील सॉफ्टवेअर जाहिरात मान्यता, निवड समिती, अंतिम मान्यता इत्यादींची कार्यवाही करावी. विद्यापीठाद्वारा प्राचार्य, शिक्षक व समकक्ष पदांचे मान्यतेचे प्रस्ताव अंतिम निवडीचे प्रस्ताव सोडून ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येतील, यांची नोंद घ्यावी, असे प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी कळविले आहे.

या ऑनलाईन सॉफ्टवेअरसाठी ’युनीक’चे संचालक डॉ.प्रवीण यन्नावार, उपकुलसचिव डॉ.संजय कवडे यांच्यासह प्रोग्रामर यशपाल साळवे, दत्तात्रय पर्वत, राजेश राठोड, सचिन चव्हाण, माधुरी कुलकर्णी, अशिष वडोदकर आदींनी प्रयत्न केले आहेत.

ब्रेकिंग न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर लाईव्ह गुगल अ‍ॅप इन्स्टॉल करा

 ’पेपरलेस ऑफीस’कडे वाटचाल : कुलगुरु
’आसीटी’ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन विद्यापीठ प्रशासनाने पारदर्शकता गतीमानता व सूसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. ’ऑनलाईन’ प्रक्रियेमुळे वेळेची तसेच कागदांची बचत होईल. तसेच सर्व प्रकारचा डाटा ऑनलाईन उपलब्ध होईल. तसेच अधिकाधिक प्राध्यापकांना या समित्यांवर बाय रोटेशन जाता येईल, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!