सहशिक्षकाने २० हजारांची लाच मागितली, RTE कागदपत्र पडताळणीदरम्यान लोकेशन तफावतीचा असाही “धडा” !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – RTE (Right To Education) 25% कागदपत्रे पडताळणी समितीचा सदस्य सहशिक्षकाने २० हजारांची लाच मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी सापळ्यात समोर आले आहे.
प्रल्हाद बळीराम खुडे (वय ४० वर्षे, सहशिक्षक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा, बळीरामपूर ता. जि. नांदेड, सध्या नेमणुक RTE (Right To Education) 25% कागदपत्रे पडताळणी समिती, शिक्षण विभाग, पंचायत समिती नांदेड. रा. बसवेश्वर नगर, दत्त मंदिराजवळ हडको, नांदेड) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा (वय ६ वर्षे) याचे RTE (Right To Education) 25% अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केला होता. निवड यादीत तक्रारदार यांच्या मुलाच्या अर्जाची निवड झाल्याने RTE (Right To Education) 25% कागदपत्रे पडताळणी समिती, शिक्षण विभाग, पंचायत समिती, नांदेड यांच्या पडताळणी समितीने तक्रारदार यांच्या घरी भेट देवून पडताळणी केली.
तक्रारदार यांनी अर्ज करतेवेळीचे टाकलेले गुगलचे लोकेशन व पडताळणी करतांना पडताळणी समितीचे सदस्य प्रल्हाद बळीराम खुडे यांनी पाहिलेले लोकेशन यामध्ये तफावत असल्याचे सांगून आरोपी प्रल्हाद बळीराम खुडे यांनी सदर त्रुटीचे समायोजन करणेकरीता तक्रारदार यांचेकडे २५,००० /- ची मागणी केली. त्यावरून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून करण्यात आलेल्या लाच मागणी प्रडताळणी कारवाईत आरोपी प्रल्हाद बळीराम खुडे यांनी तक्रारदार यांना २५,०००/- रू. लाचेची मागणी करून तडजोडी अंती २०,०००/- रू पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
ही कार्यवाही ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड चे डॉ. श्री राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक कालीदास ढवळे, पोलीस निरीक्षक राहुल पखाले, सपोउपनि / संतोष शेट्टे, पोकॉ/ अरशद खान, पोकॉ / यशवंत दाबनवाड, चापोह/निळकंठ यमुनवाड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड युनिट यांनी पार पाडली. कालीदास ढवळे, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe