संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- वीज कंपनीचा कनिष्ठ अभियंता एजंटाच्या माध्यमातून लाचेच्या सापळ्यात अडकला. सिंचन विहीरीच्या फाईल मधील एन.ओ.सी प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी २१०० रुपयांची लाचेची मागणी करताना पडताळणी सापळ्यात दोघे जण अडकले. त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण जयवंत निंबाळकर (वय २९ वर्षे पद कनिष्ठ अभियंता, एम.एस.ई.बी. कार्यालय, उप विभाग परळी वर्ग ०२ रा. बँक कॉलनी परळी, ता. परळी, जि.बीड) २. शाहनिक दत्तात्रय अनुसे (३५, व्यवसाय खाजगी काम, रा. रेवली, ता. परळी, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक २४/०२/२०२३ रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की, तकारदार यांचे वडीलांचे व साक्षीदारांचे भाऊ यांचे नावे असलेल्या शेता मध्ये महत्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अल्प भुधारक शेतकरी सिंचन विहीरीचे फाईल मधील एन.ओ.सी प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी निंबाळकर हे खाजगी व्यक्ती अनुसे यांच्या मार्फतीने ३००० रुपये लाचेची मागणी करत आहेत. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे तक्रार दिली.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २४/०२/२०२३ रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता निंबाळकर यांनी तक्रारदार यांच्या कडे ३०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २१०० रुपये ( दोन हजार शंभर रुपये) खाजगी व्यक्ती अनुसे यांच्या मार्फतीने लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजीनगर, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी व पोलीस अंमलदार,श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी गणेश मेहत्रे सर्व बीड युनिट यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe