छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

फुलंब्री तालुक्यातील पिंपळगावात आकडे टाकून वीजचोरी ! दीड लाखांची वीजचोरी, दहा जणांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ : फुलंब्री तालुक्यातील पिंपळगावात आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 10 ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केशवराव कोंडीबा वाहटुळे, जगन्नाथ विश्वनाथ लगड, अजिनाथ लक्ष्मण खंडागळे, गुलाबराव गोपीनाथ वाहटुळे, साईनाथ शेखु वाहटुळे, सागर कचरू वाहटुळे, अंकुश धोंडीबा वाहटुळे, भास्कर पांडुरंग आहेर, गणेश दादाराव वाहटुळे व जगन्नाथ यशवंता वाहटुळे या 10 ग्राहकांनी 8001 युनिटची वीजचोरी केली.

त्यांना वीजचोरीप्रकरणी 1 लाख 49 हजार 120 रुपयांची ‍बिले देण्यात आली आहेत. या सर्व आरोपींवर चिकलठाणा पोलिस ठाण्यात महावितरणच्या वारेगाव शाखेचे कनिष्ठ अभियंता अमोल घोडके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!