देश\विदेशमहाराष्ट्र
Trending

आदर्श नागरी पतसंस्था, रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, देवळाई महिला, मलकापूर अर्बनच्या घोटाळ्यावर खा. इम्तियाज जलील यांचा संसदेत जोरदार हल्लाबोल ! सहा महिन्यांच्या आत सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आदेश द्या !!

नवी दिल्ली, दि. ७ – आदर्श नागरी पतसंस्था, रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, देवळाई महिला, मलकापूर अर्बनच्या घोटाळ्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत जोरदार मुद्दा उचलला. कमीत कमी २००० कोटींच्या या घोटाळ्यात आरबीआयने इंटरविन करून सहकार डिपार्डमेंटला सहा महिन्यांत सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.

सहकारी पतसंस्था व सहकारी बँकाच्या घोटाळ्यावर खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सभापती महोदय, देशभरात लाखों ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची दररोज कशी लूट केली जाते याचे उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील काही सहकारी संस्थांबद्दल सांगायचे आहे. या सहकारी पतसंस्थांनी मिळून सर्वसामान्य ठेवीदारांच्या किमान 2000 कोटी रुपयांच्या ठेवी घेऊन फरार झाले. आदर्श नागरी पतसंस्थेचे 62000 ठेवीदार आहेत. रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, 80 टक्के ठेवीदार जे माजी सैनिक आहे. ज्यांनी आपले पैसे अशा सहकारी पतसंस्थांत गुंतवले. सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये गुंतवले.

देवळाई महिला, मलकापूर अर्बन, अमरावतीची अनुग्रह, मुंबईतील नागरी पतसंस्था आदींनी मिळून किमान 2000 हजार कोटी रुपये बुडवले. अध्यक्ष मोहदय या सहकारी पतसंस्थांवर RBI किंवा सहकार खात्याचे कोणतेही नियंत्रण नाही. अध्यक्ष महोदय, आदर्श नागरी पतसंस्था माझ्या औरंगाबाद मतदारसंघात येते. 62000 ठेवीदार आहेत. अशा काही महिला आहेत ज्यांची आयुष्यभराची कमाई ₹ 200000 आहे. त्यांनी अशा पतसंस्थेत ₹200000 गुंतवले कारण तेथे व्याजदर जास्त आहे.

लालूच दाखवून लोकांच्या पीएफचे पैसे घेतले जातात. कोणी निवृत्त होत असेल तर त्याच्या निवृत्तीचे पैसे घेतले जातात. आणि हे पैसे घेतल्यानंतर सुरुवातीला ते त्यांना चांगला परतावा देतात. मात्र नंतर ते पैसे घेवून पळून जातात. मी स्वतः सरकारला विनंती करू इच्छितो की RBI ने अशा सहकारी संस्थांमध्ये त्वरित इंटरविन करावे आणि सहकार खात्याला सक्त सूचना द्याव्यात की सहा महिन्यांत सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे परत करावेत.

सांसद इम्तियाज जलील ने संसद में आदर्श नागरी पतसंस्था, रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, देवलाई महिला, मलकापुर अर्बन घोटालों पर जमकर हमला बोला।

अध्यक्ष महोदय, हररोज देशभर में लाखों डिपॉजिटर्स के करोड़ों रुपया कैसा लूटा जा रहा है इसका उदाहरण महाराष्ट्रा के कुछ कॉऑपरेटिव्ह सोसायटीज् के बारे मे बताना चाहता हूं. जिन्होने मिलकर कम से कम 2000 करोड रुपए का जो उन लोगों के डिपॉजिट थे उसको लेकर फरार हो गए. आदर्श नगरी पतसंस्था 62000 डिपॉजिटर्स है. रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, ८० परसेंट डिपॉजिटर जो एक्स आर्मीमॅन है. जिन्होने अपना पैसा इसमे लगाया. कोऑपरेटिव्ह सोसायटी और कोऑपरेटिव्ह बॅंकमे.  देवळाई महिला, मलकापूर अर्बन, अमरावतीकी अनुग्रह, मुंबई की नागरी पतसंस्था ऐसे कुलमिलाकर कम से कम २००० हजार करोड रुपये. अध्यक्ष महोदय ना तो इनपर आरबीआय का कंट्रोल है ना कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट का. अध्यक्ष महोदय आदर्श नागरी पतसंस्था औरंगाबाद के मेरे चुनावी क्षेत्र के अंदर आती है. 62000 डिपॉजिटर्स है. कुछ ऐसी महिलाएं हैं उनकी जिंदगी भर की कमाई ₹200000 है. वह ₹200000 उसने सिर्फ इस वजह से वहां पर उस संस्था के अंदर लगाई कि वहां पर इंटरेस्ट रेट ज्यादा दिया जाता है. यह लालच दिखाकर लोगों का पीएफ का पैसा लिया जाता है. अगर कोई रिटायर हो रहा है तो उसका रिटायरमेंट का पैसा लिया जाता है. और यह पैसा लेकर यह इनिशियली तो पैसा दे देते हैं उन्हे. लेकीन बाद मे यह फरार हो जाते है.  मैं सरकार से ही अनुरोध करना चाहूंगा कि आरबीआई ने फौरन इस तरह के कोऑपरेटिव सोसाइटीज के अंदर इंटरव्यू करना चाहिए और कॉपरेटिव डिपार्टमेंट को सक्त ताकीद देणी चाहिए कि छह महिने के अंदर पैसा वापस मिलना चाहिए.

Back to top button
error: Content is protected !!