छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

एन ५, एन ३ आणि एन ८ भागांत आज पुन्हा अतिक्रमण काढले ! शहरातील विविध भागांत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची कारवाई !!

बारुदगर नाला भागातील रस्त्यावर बंद पडलेली पाच चार चाकी भंगार उचलण्यात आले

Story Highlights
  • कॅन्सर हॉस्पिटल व्हीआयपी रोड येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले
  • एन ८ परिसरात एकूण दहा शेड काढण्यात आले

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज पुन्हा शहरातील विविध भागात कारवाई करण्यात आली. आज सकाळी झोन क्रमांक एक आणि दोन बारुदगर नाला भागातील रस्त्यावर बंद पडलेली पाच चार चाकी भंगार उचलण्यात आली आहे.

यानंतर कॅन्सर हॉस्पिटल व्हीआयपी रोड येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. यामध्ये दोन रिक्षा ,पान टपरी व चार चाकी हातगाड्या काढण्यात आल्या. पथक क्र एक आणि दोन यांनी अनुक्रमे एन ०५, एन ०३ आणि एन ०८ भागात आज पुन्हा कारवाई केली.
या पथकाने एन ०५ राजीव गांधी मैदान लगत असलेले सचिन सुदेश गोखले शॉप नंबर एक यांच्या इमारतीतिल पार्किंग मधील बांधकाम निष्काशीत करून पहिले आणि दुसरे मजल्याला २४ तासाची नोटीस देण्यात आली आहे.

सदर अनधिकृत बांधकाम मुदत संपल्यानंतर काढण्यात येईल. तसेच एन -०८ परिसरात एकूण दहा शेड काढण्यात आले व उर्वरित ठिकाणी संबंधित सेक्टर मध्ये जाऊन सूचना देण्यात आली आहे. नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून आज पाऊस असल्याने सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सदर कारवाई मा. प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांचे आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त -२ तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये , सविता सोनवणे, नगर रचना विभाग उप अभियंता बाळासाहेब शिरसाट, कनिष्ठ अभियंता पुजा भोगे ,अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी, मजहर अली, रामेश्वर सुरासे व कंत्राटी इमारत निरीक्षक, मजूर ,जेसीबी पथक यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे.

Back to top button
error: Content is protected !!