छत्रपती संभाजीनगर
Trending

हप्ता मागितला म्हणून नाथ मल्टीसर्व्हिस बॅंकेच्या महिला पिग्मी एजंटला मारहाण ! केस धरून खाली पाडले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – हप्ता मागितला म्हणून नाथ मल्टीसर्व्हिस बॅंकेच्या महिला पिग्मी एजंटला मारहाण करण्यात आली. या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनकडे निघालेल्या त्या महिलेचे केस धरून खाली पाडले. तेथेही तिला मारहाण करून धमकावले. पिग्मीच्या हप्ताचे पैसे देत नाही, काय करायचे ते करा, अशी धमकीही आरोपीने दिली.

ही घटना वाणी मंगल कार्यालय, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथे घडली. लियाकत शेख, शिवाजी देविदास दसपुते आणि एक अन्य अनोळखी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी लियाकत शेख याने तीन महिन्यांपूर्वी नाथ मल्टीसर्व्हिस बॅंक (सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) येथे पिग्मीचे खाते उघडून पिगमीचे 42,000 रुपये घेतले होते. महिला फिर्यादी या नाथ मल्टीसर्व्हिस बँकेत पिग्मी गोळा करण्याचे काम करतात.

दि. २७ रोजी महिला फिर्यादीने आरोपी लियाकत शेख यास त्याने घेतलेल्या पिग्मीच्या हप्त्याची मागणी केली. यावर आरोपी लियाकत शेख हा महिला फिर्यादीस म्हणाला की, तुम्ही माझ्या घरी पैसे मागण्यासाठी का गेलात. मी पैसे देत नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून शिवीगाळ केली. धमकी देवून हाताचापटाने मारहाण केली. आरोपी लियाकत शेख याने केलेल्या मारहाणीनंतर फिर्यादी महिला पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी जात असताना वाणी मंगल कार्यालय समोर, शिवाजीनगर, येथे आरोपी लियाकत शेख व एका अनोळखीने फिर्यादीला शिवीगाळ केली.

आरोपी शिवाजी देविदास दसपुते याने महिला फिर्यादीचे केस मागून पकडून खाली पाडले. त्यानंतर लाथाबुक्क्यानी मारहाण केली. त्याच वेळी आरोपी लियाकत शेख याने महिला फिर्यादीच्या एका पायावर पाय देवून फिर्यादीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून फिर्यादीचा दुसरा पाय ओढून दुखापत केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून यांच्यावर जवाहरनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोऊपनि राऊत करीत आहेत

Back to top button
error: Content is protected !!