महाराष्ट्र
Trending

जालना जिल्हा स्री रुग्णालयाच्या डॉक्टरचे घर फोडले, दोन गॅस सिलिंडर लंपास ! शासकीय निवासस्थानच्या गार्डने संशयितास पकडून पोलिसांच्या हवाली केले !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- जालना जिल्हा स्री रुग्णालयाच्या डॉक्टरचे घर फोडून दोन गॅस सिलिंडर चोरट्यांनी लंपास केले. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर व शासकीय निवासस्थानच्या गार्डने परिसर पिंजून काढला व संशयितास पकडून पोलिसांच्या हवाली केले. या चोरीमुळे शासकीय निवासस्थाने सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

डॉ. सचितानंद बालासाहेब तौर (डॉक्टर, रा. जिल्हा स्त्री रुग्नालय, शासकिय निवासस्थान, गांधी चमन, जुना जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथ माहिती अहवालानुसार, ते स्त्री रुग्नालय व यशोदा हॉस्पिटल जालना येथे डॉक्टर म्हणून काम करतात. दिनांक 10/11/2023 रोजी 11.00 वाजेच्या सुमारास डॉक्टर सचितानंद तौर हे घराला कुलूप लावून यशोदा हॉस्पिटल येथे पेशंट असल्याने नाईट ड्युटीकरीता गेले होते. यशोदा हॉस्पिटलमध्ये पेशंट चेक करत असताना दि. 11/11/2023 रोजी सकाळी 04.20 वाजेच्या सुमारास डॉक्टर सचितानंद तौर यांना फोनवर कळाले की, त्यांच्या बिल्डींगमध्ये दोन व्यक्ती घुसले असून ते घराची लाईट बंद चालु करत आहेत.

ही माहिती मिळताच डॉक्टर सचितानंद तौर यांनी त्यांचे निवास्थान गाठले. त्यांना कडीकोंडा तुटलेला दिसला. दरवाजा उघडून पाहिले असता सामान अस्ताव्यस्त दिसले. दोन गॅस सिलिंडर जाग्यावर नव्हते. त्यानंतर डॉक्टर सचितानंद तौर यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी व हॉस्पिटलच्या सेक्युरेटी गार्ड यांनी परिसरात त्या चोरट्यांचा शोध घेतला. जवळच असलेल्या एका बिल्डींगच्या खाली पार्किंगमध्ये एक संशयित त्यांना दिसला. त्याला पकडले व विचारपूस केली. तो माळीपुरा येथील रहिवासी असून त्याने त्याच्या सोबत अजून एक जण देहेडकरवाडीतील असल्याचे सांगितले व तो गॅस सिलिंडर घेवून गेला आहे असे सांगितले.

त्यानंतर सेक्युरेटी गार्ड यांनी पोलिसांना कॉल केला व पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या संशयितास ताब्यात घेतले. याप्रकरणी डॉ. सचितानंद बालासाहेब तौर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन संशयितांवर कदीम जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!