राजुरी स्टिल कंपनीत भंगारचा ट्रक पोहोचलाच नाही ! ट्रक चालक अन् मालकाने 23 टन 360 किलो भंगार सिन्नरमध्ये विकले !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – हैदराबाद येथून निघालेला भंगार साहित्याचा ट्रक चालक आणि मालकाने परस्पर ठिकाणी नेला. तेथे भंगार साहित्य विकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हे भंगार साहित्य जालन्यातील राजुरी स्टिल या कंपनीत पोहोचलेच नाही. हे साहित्य ट्रक चालक मालकाने परस्पर नाशिक सिन्नर येथील MIDC परिसरात विकल्याचे एशियन ट्रेडर्सच्या व्यापार्याने फिर्यादीत म्हटले आहे.
ट्रकचा चालक शेख रिजवान (रा. हैदराबाद) व आदिल पठाण (रा. बायजीपुरा छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मो. फशीउद्दीन मो. इस्माईल (वय 36 वर्ष व्यवसाय भंगार व्यापार, विवेकानंद कॉलनी हैदराबाद ह.मु. बु-हान नगर, जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, मागील 15 वर्षापासून भंगार खरेदी विक्रीचे कामकाज हैदराबाद शहर व जालना शहर येथे एशियन ट्रेडर्स नांवाने करतात. ते हैदराबाद व जालना शहरात खरेदी केलेला भंगार माल हा बु-हान नगर जालना येथील जागेत ठेवत असतात.
दिनांक 17.102023 रोजी मो. फशीउद्दीन मो. इस्माईल हे हैदराबाद येथे असताना कल्पना ट्रांन्सपोर्टचा मालक हमजा शेठ यांचेकडून 12 चक्का ट्रक हा भंगार भरण्याकरीता मागवला. त्यांनी त्यांचा मध्यस्थी मुजफ्फर अहमद सिद्दीकी यांच्या मार्फत ट्रक दिनांक 18.10.2023 रोजी पाठवला. त्या ट्रकचा चालक शेख रिजवान (रा. हैदराबाद) हा व त्याच्या सोबत ट्रकचा मालक असे सांगणारा व्यक्ती आदिल पठाण (रा. बायजीपुरा छत्रपती संभाजीनगर) हे मो. फशीउद्दीन मो. इस्माईल यांच्या गोडावून मधील एकूण 23 टन 360 किलो कि. 1115,298/-रुपयांचा भंगार साहित्य भरलेला ट्रक घेऊन रात्री 11.00 वाजेच्या सुमारास जालना करीता निघाले.
भंगार साहित्य भरलेला ट्रक हा दिनांक 19.10.2023 रोजी सायंकाळी 04.00 वाजेच्या सुमारास बु-हान नगर, जालना येथे आल्याची माहिती ट्रकचा चालक शेख रिजवान याने मो. फशीउद्दीन मो. इस्माईल यांना फोनवर दिली. त्यानंतर 2-3 दिवस होऊन देखिल ट्रक मधील भंगार माल राजूरी स्टिल जालना येथे पोहोचला नाही. शिवाय ट्रक चालक शेख रिजवान याचा फोन बंद येत होता. भंगारचे साहित्य भरलेला ट्रक व त्याचा चालक मालक यांचा शोध घेत असतांना मो. फशीउद्दीन मो. इस्माईल यांना ट्रक चालक शेख रिजवान हा औरंगाबाद चौफुली जालना येथे भेटला. त्याच्याकडून मिळाली की सदरचा ट्रक राजूरी स्टिल जालना येथील कंपनीत घेऊन न जाता अंबड, पाचोड मार्गे छञपती संभाजीनगर येथील अंबिका ढाबा, झाल्टा फाटा येथे घेऊन गेले.
त्यावेळी आदिलने ट्रक मधील भंगार साहित्य विक्री करण्याकरीता दोन ते तीन ग्राहकांना दाखविले. परंतू भंगार साहित्याचे कोणतेही कागदपत्रे नसल्याने त्या ग्राहकांनी भंगार साहित्य घेण्यास नकार दिला. त्यानंतर आदिल पठाण याने दोन दिवसानंतर मोबाईलव्दारे पुढच्या पार्टीसोबत संपर्क करून ट्रक नाशिक सिन्नर येथे घेऊन जाण्याचे ठरवले. आदिल पठाणसह दोघे दिनांक 23.10.2023 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ट्रक नाशिक सिन्नर येथील MIDC परिसरात गेले. तेथे आदिल पठाण ने भंगार विक्री करीता पार्टी पाहिली व दिनांक 25,10.2023 व दिनांक 26.10.20023 रोजी रात्री 09.00 वाजेच्या सुमारास ट्रक व त्यामधील भंगार साहित्य विक्री केले, आशयाची फिर्याद मो. फशीउद्दीन मो. इस्माईल यांनी पोलिसांत दिली.
याप्रकरणी मो. फशीउद्दीन मो. इस्माईल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचा चालक शेख रिजवान (रा. हैदराबाद) व आदिल पठाण (रा. बायजीपुरा छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर एस बी जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe