छत्रपती संभाजीनगर
Trending

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पथकाने केली घाटीची पाहणी, छायाचित्रांसह अहवाल न्यायालयात सादर करणार !

उच्च न्यायालयाने खासदार जलील याचिकेत नियुक्त केलेले पाहणी पथक घाटीत दखल

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर आज दुपारी पाहणी पथक घाटीत दाखल झाले. संपूर्ण घाटीतील सर्व् विभागांची त्यांनी पाहणी केली आणि छायाचित्रांसह अहवाल हे पथक न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांना दिली. या पथकार खासदार इम्तियाज जलील यांचा व सरकारी वकीलांचा समावेश होता.

घाटी रुग्णालयात मागील काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा, कर्मचारी वर्ग कमी व विविध कारणांमुळे रुग्णांच्या उपचारांमध्ये होत असलेला विलंब खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य यंत्रणा व रुग्णालयात सुविधा शासनाच्या वतीने दिली जात नसल्याने गरीब रुग्णांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे स्वतः उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करुन स्वतः न्यायालयासमोर उभे राहून युक्तिवाद करत आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत व्हावेत, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे व गरीब रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय उपचार शासकीय रुग्णालयात मिळावे हा या जनहित याचिकेचा उद्देश आहे.

आज उच्च न्यायालयात जलील यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने घाटीच्या विविध समस्या व तक्रारी संबंधी गंभीर दखल घेत. आजच तात्काळ घाटी रुग्णालयात पाहणी करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने आज दुपारी 2.00 वाजता सरकारी वकील ॲड. सुजीत कार्लेकर, खासदार इम्तियाज जलील यांच्या पथकाने पाहणी केली. यावेळी घाटी अधिष्ठाता व इतर सर्व डॉक्टर, अधिकारी, ॲड. सुनील जाधव, ॲड. प्रसाद जरारे उपस्थित होते.

घाटी रुग्णालयात जाऊन आढावा घ्या, काय परिस्थिती आहे, रुग्णांवर होत असलेले उपचार, त्यांना मिळत असलेले उपचार, रिक्त कर्मचारी वर्ग, स्वच्छता, औषधांचा पुरवठा आदींचा अहवाल मंगळवारपर्यंत उच्च न्यायालयात दाखल करावे असे आदेश आज न्यायालयाने दिले. सरकारी वकील व जलील यांनी घाटी रुग्णालयात दोन तास पाहणी केली. अस्वच्छतेचे छायाचित्रे न्यायालयात दाखल केली होती आज स्वच्छता दिसून आली. आरोग्य यंत्रणेत ज्या त्रुटी आहेत ते दुरुस्त व्हावे. रुग्णांना योग्य पध्दतीने सुविधा व औषधी मिळावे जेणेकरून कोणाचा जीव जाणार नाही यासाठी स्वतः उच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली.

दीडशे कोटी रुपये खर्च करुन भव्य सुपर स्पेशालिटी रुग्णालय येथे उभे झाले तीन चार वर्षे झाली सुरू केले नाही. स्टाफ व नर्स नसल्याचे कारण दिले जात आहे. हे रुग्णालय खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयात तीस लाखांची यंत्रसामग्री आहे. उच्च न्यायालयाने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती प्रक्रिया 28 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी हे 1 ते 4 नोव्हेंबर पर्यंत कर्मचारी सेवेत असावी रुग्णालय 5 नोव्हेंबर पर्यंत सुरू करावे असे आदेश दिले आहेत.

आज केलेल्या पाहणीचा सविस्तर अहवाल पाहणी पथक न्यायालयात दाखल करतील. 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. गरीब रुग्णांसाठी जो मी लढा देत आहे, आरोग्य यंत्रणा मजबूत झाली पाहिजे, रिक्त पदे भरली पाहिजे, निष्पाप रुग्णांना जीव गमवायची वेळ येणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यानी दिली.

Back to top button
error: Content is protected !!