गंगापूरछत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

गंगापूर हद्दिमधून हायवा चालू देण्यासाठी पोलिस अंमलदार व हवालदार लाचेच्या सापळ्यात मात्र स्वीकारलेल्या रकमेसह पंटरने धूम ठोकली !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० -गंगापूर हद्दिमधून हायवा चालू देण्यासाठी पोलिस अंमलदार व हवालदार लाचेच्या सापळ्यात अडकले असतानाच स्वीकारलेल्या रकमेसह पंटरने मात्र धूम ठोकली. मोटारसायकलवर तो पळून गेला.

1) सुनील मुलचद राठोड, पोलिसा अंमलदार बक्कल नंबर 1649. नेमणूक- उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गंगापूर, 2) लक्ष्मीकांत हरीचंद्र सपकाळ पोलीस हवालदार/127उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गंगापूर 3) खाजगी व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

यातील तक्रारदार यांची वाळू वाहतुकीची हायवा गाडी गंगापूर हद्दिमधून चालू देण्यासाठी तसेच त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आलोसे क्र 1 सुनील मुलचद राठोड व 2 लक्ष्मीकांत हरीचंद्र सपकाळ यांनी पंचा समक्ष 15000/- लाचेची मागणी करून आलोसे क्र 1 यांनी 15000/- हजार रुपये पंटरच्या मार्फतीने स्वीकारून स्वीकारलेल्या लाचेच्या रकमेसह मोटार सायकल वरून पळून गेला आहे. त्यावरून त्यांचेविरुद्ध पोलीस ठाणे गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो. छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- संतोष घोडके, सहाय्यक सापळा अधिकारी- अमोल धस, सापळा पथक- पोलीस हवालदार भीमराज जिवडे, युवराज हिवाळे, केवलसिंग गुसिंगे, अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!