छत्रपती संभाजीनगर
Trending

छापील वीजबिलाऐवजी ई-मेलवर बिल घ्या आणि 120 रुपये सवलत मिळवा ! गो-ग्रीन योजनेमधून वीजग्राहकांची 22 लाख रुपयांची वार्षिक बचत !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेअंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पर्यावरणस्नेही 18 हजार 482 ग्राहकांकडून 22 लाख 17 हजार 840 रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. काही अपरिहार्य कारणामुळे कधी छापील बिल मिळाले नाही तर ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. परंतु ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना बिल विलंबाने किंवा न मिळण्याचा प्रश्नच उरत नाही.

वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठवण्यात येते तसेच ‘एसएमएस’द्वारेही माहिती देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्‍ट पेमेंट’चा लाभ घेणे शक्य झाले आहे. गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केले आहे.

छत्रपी संभाजीनगर परिमंडलांतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 9 हजार 585 ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत.  ग्रामीण मंडलात ‘गो-ग्रीन’मध्ये 5 हजार 775 ग्राहक सहभागी आहेत. तसेच जालना मंडलातील 3 हजार 122 ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग घेतला आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपवर किंवा https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेतील वीजग्राहकांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

Back to top button
error: Content is protected !!