बिअरबार शॉपीसाठी ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र व ठरावासाठी ग्रामसेवकाने लाच मागितली !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – बिअरबार शॉपीसाठी ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र व ठरावासाठी ग्रामसेवकाने पाच हजारांची लाच मागितली. याप्रकरणी शरदचंद्र ताम्रध्वज बलसुरे (वय 46 वर्षे, पद – ग्रामसेवक, येनेगुर, ग्रामपंचायत, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यातील तक्रारदार यांनी मौजे येणेगूर येथील शेत गट नंबर 270 मध्ये बिअरबार शॉपी चालू करण्याकरिता ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र व ठराव मिळणे कामी अर्ज व आवश्यक असलेले कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात दिलेले होते. सदर ना हरकत प्रमाणपत्र व ठराव देणे कामी यातील आरोपी ग्रामसेवक शरदचंद्र बलसुरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दिनांक 25 /04/2023 रोजी पंच साक्षीदारासमक्ष 5,000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यावरून दिनांक 27/04/23 रोजी सापळा कारवाई करण्यात आली होती. परंतु आरोपी ग्रामसेवक शरदचंद्र बलसुरे हजर नसल्याने सापळा कारवाई स्थगित करण्यात आली. आरोपी ग्रामसेवक शरदचंद्र बलसुरे यांना संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी फिर्याद दिल्याने मुरूम पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – विकास राठोड, पोलीस निरीक्षक, धाराशिव, सापळा पथक – पोलीस अंमलदार इफ्तिकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके, चालक-दत्तात्रेय करडे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe