छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

गुंठेवारीत मालमत्ता नियमित करण्यासाठी मोठी बातमी: गुंठेवारीचे प्रस्ताव सादर करण्यास सर्व आर्किटेकना मुभा !

संभाजीनगर लाईव्ह, दि. 25 – गुंठेवारीत मालमत्ता नियमित करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे आर्किटेकचे पॅनल तयार करण्यात आले होते. गुंठेवारी करण्यासाठी इच्छुक नागरिकांनी पॅनलवरती आर्किटेक मार्फतच प्रस्ताव सादर करण्याची अट महापालिकेतर्फे लावण्यात आली होती. प्रस्ताव सादर करण्याची फी महापालिकेतर्फे वास्तु विषारदाना अदा करण्यात येत होती, तथापि सदरील अट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी रद्द करून आर्किटेकला त्यांच्या स्तरावरून प्रस्ताव तयार करून सादर करण्याची मुभा देण्याच्या धोरण आज जाहीर केला.

प्रस्ताव बनवून सादर करण्याची फी आता महानगरपालिका देणार नाही, सदरील शुल्क आर्किटेक्ट यांनी संबंधित नागरिकांकडून वसूल करावी, ते म्हणाले. आज संध्याकाळी पाच वाजता आर्किटेक्ट असोसिएशन यांच्यासमवेत गुंठेवारी, बांधकाम परवानगी व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे संपन्न झाली. सदरील बैठकीत आर्किटेक्ट यांना संबोधित करताना प्रशासक जी श्रीकांत यांनी सदरील धोरण जाहीर केले.

किमान कागदपत्रे घेऊन गुंठेवारी सहज करता येईल आणि अवैध बांधकामांना वाव मिळणार नाही- याशिवाय महापालिकेतर्फे बांधण्यात येणारी इमारतींचे डिझाईन तयार करण्यासाठी महानगरपालिका आर्किटेक यांचे पॅनल तयार करत आहेत ते म्हणाले. भविष्यात महानगरपालिकेची कोणतीही इमारत बांधताना सदरील पॅनल वरील आर्किटेक यांच्याकडून डिझाईन मागविण्यात येईल आणि याच्यातून एक डिझाईन निवडला जाईल, ते म्हणाले. याशिवाय शहरातील आर्किटेक यांनी शहर विकास आराखडा, किमान कागदपत्रे घेऊन गुंठेवारी सहज करता येईल आणि अवैध बांधकामांना वाव मिळणार नाही अशी पॉलिसी तयार करण्यास महापालिकेची मदत करावी व त्यांचे सल्ले महानगरपालिकेला द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए बी देशमुख, उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, डीपी युनिटचे प्रमुख रजा खान आणि आर्किटेक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि सदस्य यांची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!