छत्रपती संभाजीनगर
Trending

शेतकऱ्यांकडून पीक विमा भरताना अधिकचे शुल्क घेणाऱ्या CSC केंद्रांवर कारवाईचा बडगा !

शासकीय योजनेचा लाभ देण्यात बँकांचा महत्वपूर्ण सहभाग- जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

संभाजीनगर लाईव्ह, दि. 13 : जिल्ह्यात शेतकरी, लघुउद्योजक यांना विविध कर्ज योजनेचा लाभ देऊन देशात व राज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व कृषी पायाभूत सुविधा योजनेच्या वितरणात राज्यात प्रथम क्रमाकांचे उद्ष्टि पूर्ण केले आहे. यामध्ये सर्व बँकांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. जिल्हास्तरीय बँकर्स समितीची वार्षिक कर्ज योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, शेतकऱ्यांकडून पीक विमा भरताना अधिकचे शुल्क घेणाऱ्या CSC केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

याबैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना, बँक ऑफ महाराष्ट्र चे विभागीय प्रबंधक महेश डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार, सर्व बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी , सर्व तालुका कृषी अधिकारी,विविध विभागाचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.

जिल्हा अग्रणी बँकेच्या वार्षिक ऋण योजना 2023-24 अहवालाचे प्रकाशन यावेळी जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. बँकांनी यावर्षी गेल्या वेळेच्या तुलनेने रु ७१६७ कोटी चे उद्दीष्ट वाढवून रु २२४०५ कोटी चे उद्दीष्ट घेतले आहे. यामध्ये कृषी क्षेत्राला रू ४०२१ कोटी, उद्योगासाठी रु ५६३५ कोटींचे व पीक कर्जासाठी रू. २२५० कोटीचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे.

बँकर्स समितीच्या बैठकीत योजनानिहाय आढावा – केंद्र शासनाच्या अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पीक कर्ज योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मुद्रा, ‘स्टँड अप इंडिया’, पपीक कर्ज योजना, मध्यम व लघु कर्ज योजनेचा जिल्ह्याचा लक्षांक व यामध्ये बँक, विविध शासकीय विभागानी पूर्ण केलेले उद्दीष्ट यांचा योजनानिहाय आढावा बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत सादर करण्यात आला.

प्रामुख्याने ‘स्टँड अप इंडिया’, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आणि पीक कर्ज वितरणात जिल्ह्यात बँकाची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ बँक यांच्यासह संबंधित बँक व्यवस्थापकाचे अभिनंदन केले.

घरकुलासाठी देण्यात येणाऱ्या कर्ज वितरणाचे प्रमाण कमी- जिल्ह्यात घरकुलासाठी देण्यात येणाऱ्या कर्ज वितरणाचे प्रमाण कमी असल्याने यावर सर्व संबंधित तहसिलदार, नगरपालिका आणि बँक प्रतिनिधी यांनी समन्वयातून लक्षांक पूर्ण करुन सर्वसामान्यांना घरकुल गृहकर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्यावे असे सांगितले. तसेच शैक्षणिक कर्ज प्रस्तावातील प्रमाण वाढावे यासाठी व्यावसायिक शैक्षणिक संस्थामध्ये बँकानी शिबीर घेऊन प्रमाण वाढवावे व विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे. ज्यास्तीत ज्यास्त पथ विक्रेत्यांना PMSVAnidhi योजनेअंतर्गत रू १०००० ते रू ५००००/- पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महानगरपालिकेने आणखीन नवीन पथ विक्रेत्यांचा सर्व्हे करून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा असे सांगितले.

विकासदर, महागाई दर आणि लोकसंख्या यातून यापूढील वार्षिक ऋण व त्रैमासिक अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापक यांना केली.

महिला बचत गटांना क्षमता बांधणीसाठी कर्जाची रक्क्म वापरण्याचे निर्देश- उमेद अभियानाअंतर्गत महिला स्वंयसहायत्ता बचत गटाना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा आढावा घेऊन 25 हजाराच्या आत उत्पन्न असणाऱ्या विविध तालुक्यातील महिला बचत गटांना क्षमता बांधणीसाठी कर्जाची रक्क्म वापरण्याचे निर्देशही देण्यात आले.यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रवर्तक व कार्यकर्त्यांनी महिलांचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी कर्ज पुरवठा व त्याचा विनीयोग योग्य व्हावा यासाठी नियोजन करण्याचे श्री.पाण्डेय यांनी सूचित केले.

मुख्यमंत्री रोजगार हमी कार्यक्रम तसेच पंतप्रधान रोजगार हमी कार्यक्रमाच्या अंतर्गत प्राप्त प्रस्तावावर बँकानी सकारत्मक निर्णय घ्यावा व जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी साह्य करावे. याबरोबरच विविध महामंडळाच्या कर्ज वितरण, अडचणी यावर उपाययोजनाबाबत संबंधिताना सूचित केले. यासंदर्भात २० जुलै पर्यंत विविध बँकांच्या अंचल प्रबंधक व महामंडळ सोबत बैठक लावण्याच्या सूचना अग्रणी बँक व्यवस्थापक यांना करण्यात आल्या.

शेतकऱ्यांकडून पीक विमा भरताना अधिकचे शुल्क घेणाऱ्या CSC केंद्रांवर कारवाईचा बडगा – शेतकऱ्यांना पीक विमा भरताना अधिकचे शुल्क आकाराल्यास CSC केंद्रावर कारवाई करण्यात येत असुन जिल्ह्यातील पीक विमा भरताना काही अडचणी आल्यास आपले सरकार सेवा केंद्र,आणि पीक विमा साठी शासनांनी नियुक्ती केलेले चोलामंडल एम .एस.जनरल इन्शुरन्स कंपनीचे औरंगाबाद जिल्हा समन्वयक, ईश्वर भिंगारे यांच्या- 8551020314 या संपर्क क्रमाकांवर संपर्क साधावा. तसेच कंपनीचा कार्यालाचा पत्ता ,एन-11 सुदर्शन नगर, जळगाव रोड ,मयुरी हॉटेल जवळ, औरंगाबाद या पत्त्यावर देखील संपर्क साधता येईल.याबाबत सर्व कृषि अधिकारी, तहसिलदार यांनी शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याबाबत मार्गदर्शन व जाणिवजागृती करुन एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. असे पाण्डेय यांनी निर्देशित केले.

Back to top button
error: Content is protected !!