महाराष्ट्र
Trending

जालन्यातील धर्मादाय कार्यालयातील निरीक्षक लाच घेताना चतुर्भुज ! देव पिंपळगाव येथील श्री भैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट, फेरफारसाठी घेतले दहा हजार !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – जालन्यातील धर्मादाय कार्यालयातील निरीक्षकास लाच पकडले. देव पिंपळगाव येथील श्री भैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट, फेरफारसाठी दहा हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात निरक्षक अलगद अडकले.

धरमसिंग भाऊसिंग जंघाळे (वय 45 वर्षे, पद – निरीक्षक सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालय जालना, वर्ग-3) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांना मौजे देव पिंपळगाव येथील श्री भैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट / फेरफार करण्यासाठी आरोपी धरमसिंग भाऊसिंग जंघाळे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांना दि. 17.05.2023 रोजी 20,000/- रुपये लाचेची मागणी केली.

सुरुवातीला 10,000/- रू व काम झाल्यानंतर उर्वरित 10,000/- रुपये देणेबाबत लाचेची मागणी त्यांनी केली. आज दि. 23.05.2023 रोजी लाचेची रक्कम 10,000/- रुपये पंचासमक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, जालना, सापळा अधिकारी:-पोलिस निरीक्षक शंकर म. मुटेकर, सापळा पथक – पो.ह. गजानन घायवट, गजानन कांबळे, गणेश चेके, गणेश बुजाडे,कृष्णा देठे, शिवाजी जमदाडे, ज्ञानदेव झुंबड यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!