महाराष्ट्र
Trending

एअर गनचा धाक दाखवून जालना देऊळगावराजा मार्गावरील जामवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर दरोडा ! अवघ्या चार तासांत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या, जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई !!

संभाजीनगर लाईव्ह, १५- एअर गन आणि चाकूचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा घालणार्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्या जालन्याच्या पोलिसांनी अवघ्या चार तासांत आवळल्या. पाच आरोपीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.

(1) गणेश प्रल्हाद विधाते (वय 21 वर्षे रा. लालबाग जालना) (2) साबेर सय्यद निसार सय्यद वय 21 वर्षे, रा. चंदनझिरा जालना, (3) कैसर ऊर्फ सोनू सांडू शेख वय 26 वर्षे, रा. मियासाब दर्गा मस्तगड जालना, (4) योगेश एकनाथ खणपटे वय 28 वर्षे, रा. जमुनानगर जालना, (5) शेख आजम शेख मुख्तार वय 22 वर्षे, रा. जमुना नगर जालना अशी आरोपींची नावे आहेत.

जालना ते देऊळगावराजा या महामार्गावरील मौजे जामवाडी शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दिनांक 14/07/2023 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात पाच आरोपीतांनी पेट्रोल पंपावरील वॉचमन व कर्मचारी यांना खंजीर व एअर गण चा धाक दाखवून त्यांना मारहाण करून 32,000/- रुपये जबरीने चोरून नेले होते. या प्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना येथे विनायक सखाराम काळे (रा. काद्राबाद जालना) यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा घडल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ स्थागुशा जालना यांनी भेट देऊन गुन्हे शाखेचे पथके तयार करून पथकातील अधिकारी व अमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 15/07/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार हे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारा मार्फतीने दरोड्यातील आरोपीतांची माहिती घेत असतांना सदरचा गुन्हा हा (1) गणेश प्रल्हाद विधाते (वय 21 वर्षे रा. लालबाग जालना) याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ आरोपी गणेश विधाते यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार (2) साबेर सय्यद निसार सय्यद वय 21 वर्षे, रा. चंदनझिरा जालना, (3) कैसर ऊर्फ सोनू सांडू शेख वय 26 वर्षे, रा. मियासाब दर्गा मस्तगड जालना, (4) योगेश एकनाथ खणपटे वय 28 वर्षे, रा. जमुनानगर जालना, (5) शेख आजम शेख मुख्तार वय 22 वर्षे, रा. जमुना नगर जालना यांच्या सोबत मिळून काल संध्याकाळी एकत्रित येवून पेट्रोलपंप लुटण्याचे ठरविले.

त्यानंतर सर्व आरोपी हे जालना-देऊळगाव राजा रोड जवळ दरोडा टाकण्यासाठी उपयोगी असलेले दोन चाकू, एक एअर गन असे सोबत घेऊन दोन मोटार सायकलवर पेट्रोलपंपातील कॅबीनमध्ये घुसले. तेथील पेट्रोलपंपावर काम करणान्या दोन जणांना चाकुचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्या गल्ल्यातील व खिश्यातील पैशे चोरी केल्याचे सागितले. त्यानंतर गुन्हयातील ईतर साथिदारांना वेगवेगळ्या ठिकाणावरून शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले दोन चाकू, एक एअर गन, दोन मोटार सायकली मोबाईल फोन व गुन्हयात लुटलेली रोख रक्कम असा एकूण 1,36,500 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यातील आरोपी गणेश प्रल्हाद विधाते, वय 21 वर्षे, रा. लालबाग जालना, 2) कैसर ऊर्फ सोनु सांडु शेख वय 26 वर्षे, रा. मियासाब दर्गा मस्तगड जालना व इतर एक आरोपी असे तिघांनी मिळून पोलीस स्टेशन कदिम जालना येथील गुन्हा केल्याचे मान्य केले असल्याने तो गुन्हा देखील उघडकीस आला आहे.

पाचही आरोपीना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन तालुका जालना येथे हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल, सपोनि आशिष खांडेकर, पोउपनि प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, योगेश सहाने, धीरज भोसले सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!