जिल्हा परिषदेचा आरोग्य सहाय्यक लाच घेताना रंगेहात पकडला ! जालना झेडपीच्या आरोग्य विभागातील भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – मेडिकल बिलाच्या एनओसीसाठी दोन हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेचा आरोग्य सहायक लाच घेताना रंगेहात पकडला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे जालना झेडपीच्या आरोग्य विभागातील भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर आला आहे.
रमेश रामधन राठोड (वय 48 वर्षे, पद – आरोग्य सहायक, वर्ग – 3, नेमणूक – आरोग्य विभाग, जि. प. कार्यालय, जालना) असे आरोपीचे नाव आहे. यातील तक्रारदार हे स्वतः आरोग्य विभागात नोकरीस असून त्यांची बदली जि.प. नांदेड येथे झालेली आहे. तक्रारदार यांनी दि.19/01/2023 रोजी मेडिकल बिल रुपये 29362 व 61859 रुपये असे एकूण 91,221 रुपयांची फाईल आरोग्य विभागात दिलेली होती. त्यावेळी तक्रारदार यांचेकडून आरोपी राठोड याने व सुधाकर मांटे यांनी 5000 रुपये. घेतले होते परंतु पैसे घेऊन पण मेडिकल बिल मंजूर केले नव्हते. या दरम्यान तक्रारदार यांची जि .प .नांदेड येथे बदली झाली.
त्यामुळे मेडिकल बिल मंजूर नाही याबाबत किमान NOC तरी द्यावी म्हणून दि.12/07/2023 रोजी NOC देण्याबाबत लेखी अर्ज केलेला होता. आज, दि.14/09/2023 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार लाच पडताळणी कारवाई दरम्यान सदर NOC साठी आरोपी राठोड याने सरोज बिडला मॅडम कनिष्ठ सह्यायक यांच्या नावाने 2000 रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष करून स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यावरून सापळा कारवाई दरम्यान आज आरोपी राठोड याला पंचासमक्ष 2000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी राठोड यांच्याकडून 2,000 रुपयांच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाणे कदिम जालना जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई संदीप अटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना, सापळा पथक – पोलिस अमलदार गणेश बुजडे, गणेश चेके, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, चालक कापसे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe