छत्रपती संभाजीनगर
Trending

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अखेर संपूर्ण नामांतर ! छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग, धाराशिव जिल्हा नामकरण फलकाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६: छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

यावेळी छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग आणि धाराशिव जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला.

दरम्यान, औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नावही आता बदलन्यात आलं आहे. संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. राज्य सरकारनं यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी केवळ शहराचं नाव बदललेलं होतं. आता संपूर्ण विभाग आणि जिल्ह्याचं छत्रपती संभाजीननगर असं नामांतर करणारी अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे.

औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद उपविभाग, औरंगाबाद तालुका आणि औरंगाबाद गाव या सर्वांचं नामांतर आता छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर उपविभाग, छत्रपती संभाजीनगर तालुका आणि छत्रपती संभाजीनगर गाव असं नामांतर करणारी अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. दरम्यान, नामांतराच्या फलकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनावरण करण्यात आलं.

Back to top button
error: Content is protected !!