महाराष्ट्र
Trending

पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकाला २ हजारांची लाच घेताना पकडले !

उस्मानाबाद, दि. १ – महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती उमरगा येथे गोठ्याचे शेड बांधकाम अनुदान प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकाला २ हजारांची लाच घेताना पकडले. ही कारवाई आज, १ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

बुद्धार्थ ग्यानु झाकडे (वय 55 वर्षे, पद :- कनिष्ठ सहाय्यक ,पंचायत समिती कार्यालय जि.उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती उमरगा येथे गोठ्याचे शेड बांधकाम अनुदान मिळणे कामी दाखल केलेल्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी 2000/-रुपये लाचेची मागणी केली. लागलीच 2000/- रुपये लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष आरोपीने स्वीकारली.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी :- विकास राठोड, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोलीस अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके,सचिन शेवाळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!