देश\विदेश
Trending

केदारनाथ यात्रेची नोंदणी ८ मेपर्यंत थांबवली ! पुढील तीन ते चार दिवस खराब हवामानाची शक्यता !!

डेहराडून, दि. ५: केदारघाटीमध्ये खराब हवामानाची शक्यता लक्षात घेऊन केदारनाथ धाम यात्रेची नोंदणी ८ मेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. केदारघाटीमध्ये पुढील तीन ते चार दिवस खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिल रोजी उघडण्यात आले असून 4 मे पर्यंत एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी केदारनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.

2013 च्या आपत्तीपासून उत्तराखंड सरकार अत्यंत सावधगिरी बाळगत आहे. हिमालयीन प्रदेशात हवामान खराब असून मुसळधार बर्फवृष्टी आणि पावसामुळे बुधवारी केवळ केदारनाथ यात्राच पुढे ढकलण्यात आली नाही, तर धामाकडे येणाऱ्या भाविकांना ऋषिकेश, श्रीनगर, फाटा, गौरीकुंडसह विविध ठिकाणी थांबवण्यात आले. दरम्यानच्या काळात केदारनाथमध्ये कोणतीही मोठी हानी झाली नाही.

बुधवारीच केदारनाथ खोऱ्यातील कुबेर ग्लेशियरचा मोठा भाग तुटून पादचाऱ्यांच्या मार्गावर पडला. त्यामुळे संपूर्ण मार्ग बर्फाने झाकून गेला होता. याशिवाय लिंचोलीहून केदारनाथकडे येणारे नेपाळी वंशाचे चार जण बर्फात अडकले होते. त्यांना एसडीआरएफ पथकाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुखरूप बाहेर काढले.

केदारनाथ धामला देशातूनच नव्हे तर संपूर्ण विश्वातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

ब्रेकिंग न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर लाईव्ह गुगल अ‍ॅप इन्स्टॉल करा

Back to top button
error: Content is protected !!