मित्राच्या वरातीमध्ये नाचत असताना धक्का लागला म्हणून चाकू व लोखंडी रॉडने हल्ला !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – मित्राच्या वरातीमध्ये नाचत असताना धक्का लागला म्हणून चाकू व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. यात विकास मधुकर नरवडे हा युवक जखमी झाला.
रात्री ९ वाजेच्या सुमारास माऊली मेडिकल जवळ म्हाडा कॉलनी छत्रपती संभाजीनगर परिसरात ही घटना घडली. 1) पृथ्वी मानकापे पाटील (वय- अंदाजे 20 वर्षे रा.एन-6 सिडको छत्रपती संभाजीनगर), 2) पवन पाटील (वय-अंदाजे 19 वर्षे, रा. जयभवानीनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
विकास मधुकर नरवडे (वय-24, वर्षे धंदा-किराणा दुकान, रा. संजयनगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.06/09/2023 रोजी रात्री 09.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी विकास नरवडे यांचा मित्र धिरज केदारे (रा. संजयनगर गल्ली न. 21 छत्रपती संभाजीनगर) याचे लग्न धुत हॉस्पिटल समोरील राजस्थान मैदानावर होते.
फिर्यादी विकास नरवडे वरातीत नाचत असतांना त्यांचा धक्का आरोपी क्र. 1 पृथ्वी मानकापे पाटील यास लागल्याने त्याने फिर्यादी विकास मधुकर नरवडे यास शिविगाळ करुन पाठीवर लाथ मारली व आरोपी क्र.2 पवन पाटील याने सुद्धा शिविगाळ करुन खिशातील चाकू काढून फिर्यादी विकास नरवडे याच्या पाठीवर मारून जखमी केले. हातापायानेही मारहाण केली. आरोपी क्र. 1 पृथ्वी मानकापे पाटील याने त्याच्या कमरेला असलेला लोखंडी रॉड काढून फिर्यादी विकास नरवडे याच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारुन हाड फॅक्चर करुन गंभीर जखमी केले.
याप्रकरणी विकास मधुकर नरवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 1) पृथ्वी मानकापे पाटील (वय- अंदाजे 20 वर्षे रा.एन-6 सिडको छत्रपती संभाजीनगर), 2) पवन पाटील (वय-अंदाजे 19 वर्षे, रा. जयभवानीनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर एम सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जोगस करीत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe